• Download App
    Operation Kaveri : पोर्ट सुदानहून जेद्दाहसाठी भारतीयांच्या आणखी दोन तुकड्या रवाना, आतापर्यंत एकूण पाच तुकड्या निघाल्या! Operation Kaveri Two more units of Indians left for Jeddah from Port Sudan total five units left so far

    Operation Kaveri : पोर्ट सुदानहून जेद्दाहसाठी भारतीयांच्या आणखी दोन तुकड्या रवाना, आतापर्यंत एकूण पाच तुकड्या निघाल्या!

    भारत सरकार विमानं आणि नौदलाच्या जहाजांच्या मदतीने सुदानमधील भारतीयांना सुखरूप बाहेर काढत आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तेथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम वेगवान केले आहे. बुधवारी रात्री ३६० भारतीय नागरिकांची पहिली तुकडी सौदी अरेबियातील जेद्दाहून दिल्लीला पोहोचली. त्याचवेळी पोर्ट सुदानमधून भारतीय नागरिकांची चौथी आणि पाचवी तुकडी जेद्दाहला रवाना झाली आहे. Operation Kaveri Two more units of Indians left for Jeddah from Port Sudan total five units left so far

    माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची चौथी तुकडी सुदान बंदरातून जेद्दाहला रवाना झाली आहे. हवाई दलाच्या C-130J विमानाने 136 प्रवाशांना घेऊन उड्डाण केले आहे.

    यासोबतच ते म्हणाले की, INS तेगही २९७ प्रवाशांसह पोर्ट सुदान येथून जेद्दाहसाठी रवाना झाले आहे, ही भारतीयांची पाचवी तुकडी आहे.

    INS तेग आणि सुमेधाने सांभाळला मोर्चा  –

    तत्पूर्वी, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी बुधवारी जेद्दाह विमानतळावर पोहोचल्यावर भारतीय लोकांचे स्वागत केले. नौदलाचे जहाज INS सुमेधा देखील २७८ भारतीयांसह जेद्दाह बंदरात पोहोचले. परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले की ऑपरेशन कावेरी अंतर्गत आणखी १३५ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, ही तिसरी तुकडी होती.

    भारत सरकार विमान आणि नौदलाच्या जहाजांच्या मदतीने सुदानमधील लोकांना सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरापर्यंत पोहोचवत आहे, त्यानंतर त्यांना हवाई दलाच्या विमानांद्वारे भारतात परत आणले जात आहे.

    Operation Kaveri Two more units of Indians left for Jeddah from Port Sudan total five units left so far

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या