• Download App
    चीनमध्ये एकाला H10N3 बर्ड फ्लूची लागण; मानवी संसर्गाच जगातील पहिलच प्रकरण One infected with H10N3 bird flu in China; The first case of human infection in the world

    चीनमध्ये एकाला H10N3 बर्ड फ्लूची लागण; मानवी संसर्गाच जगातील पहिलच प्रकरण

    वृत्तसंस्था

    बीजिंग : चीनमधून उदयास आलेल्या कोरोना विषाणूचा जग सामना करत आहे. त्या चीनमध्ये बर्ड फ्लूच्या स्ट्रेनमुळे (H10N3) मानवी संसर्गाची पहिली घटना समोर आली आहे. तेथील नॅशलन हेल्थ कमिशनने याची पुष्टी केली. One infected with H10N3 bird flu in China; The first case of human infection in the world
    संक्रमित 41 वर्षीय व्यक्ती झेनजियांग शहरातील रहिवासी आहे. 28 मे रोजी बर्ड फ्लूचा स्ट्रेन या रूग्णात आढळला. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. सध्या आरोग्य अधिकाऱ्यांनी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्याचा शोध सुरू केला आहे.



     

    संसर्गाची पहिलीच घटना

    पोल्ट्रीमधून मानवामध्ये विषाणूचे संक्रमण होण्याची ही तुरळक घटना आहे. यातून साथीचा रोग होण्याचा धोका अत्यंत कमी आहे. नॅशनल हेल्थ कमिशनने, मात्र या व्यक्तील या स्ट्रेनची लागण कशी झाली ? याची माहिती दिली नाही.  बर्ड फ्लू एक व्हायरल इन्फेक्शन आहे, ज्यास एव्हियन इन्फ्लूएन्झा देखील म्हणतात. त्याचे बर्‍याच प्रकारचे स्ट्रेन असतात. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले की या स्ट्रेनमधून मानवी संसर्गाची कोणतीही घटना यापूर्वी जगभरात नोंदली नव्हती. यातून साथीचा रोग होण्याची शक्यता कमी आहे.

    One infected with H10N3 bird flu in China; The first case of human infection in the world

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Russia : रशियात भारतीय विद्यार्थ्यांच्या शोषणाचे प्रकार वाढले; 2025 मध्ये जगभरात 350 तक्रारी, त्यापैकी 200 रशियातून

    US EXILE Act : अमेरिकन संसदेत H-1B व्हिसा रद्द करणारे विधेयक सादर; भारतीयांवर सर्वाधिक परिणाम होईल

    Iran Defies : इराण म्हणाला- युरेनियम संवर्धन थांबवणार नाही; घाबरवून आमच्याकडून काहीही करवून घेतले जाऊ शकत नाही, अमेरिकेच्या हेतूवर विश्वास नाही