• Download App
    महाराष्ट्रात ८ रूग्ण; तर राजस्थानात जयपूरमध्ये आढळले ९ रूग्ण!!; उद्या कोविड टास्क फोर्सची दिल्लीत तातडीची बैठक!!Omicron positive 9 patients found in Jaipur and 8 in Maharashtra

    ओमायक्रॉन : महाराष्ट्रात ८ रूग्ण; तर राजस्थानात जयपूरमध्ये आढळले ९ रूग्ण!!; उद्या कोविड टास्क फोर्सची दिल्लीत तातडीची बैठक!!

    डोंबिवलीत १ पिंपरी-चिंचवडमध्ये ६, तर पुण्यात १ पॉझिटिव्ह रूग्ण!!Omicron positive 9 patients found in Jaipur and 8 in Maharashtra


    वृत्तसंस्था

    मुंबई/ ज़यपूर : महाराष्ट्रात ओमायक्रॉन पॉझिटव्ह रूग्णांची एकूण संख्या ८ झाली असून राज्याच्या दृष्टीने चिंता वाढवणारी ही बातमी समोर आली आहे. पण त्या पलिकडे राजस्थानची राजधानी जयपुर मधून अधिक चिंता वाढवणारी बातमी आली असून शहरात ओमायक्रोनचे ९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

    यानंतर देशभरात अलर्ट जारी झाला असून उद्या कोविड टास्क फोर्सची बैठक होऊन त्यामध्ये लसीकरणा संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येईल. यात लहान बालकांच्या लसीकरणाच देखील समावेश असेल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

    महाराष्ट्रत आज ७ नवीन ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील ओमायक्रॉन पॉझिटव्ह रूग्णांची एकूण संख्या ८ झाली आहे.

     

    आज आढळलेल्या ७ रुग्णांमध्ये पिंपरी – चिंचवडमध्ये ६ तर पुण्यातील एक रूग्णाचा समावेश आहे. त्यामुळे डोंबिवली पाठोपाठ आता पुणे तसेच पिंपरीत देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला दिसतो
    आहे. त्यामुळे सरकार इथून पुढे कोणते पाऊल उचलते आहे, याकडे लक्ष लागले आहे.

    Omicron positive 9 patients found in Jaipur and 8 in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या