विशेष प्रतिनिधी
हेग : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे नेदरलँडमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान फक्त सुपरमार्केट, वैद्यकीय, व्यवसाय आणि कार गॅरेज यांसारखी अत्यावश्यक दुकानं खुली राहतील.Omaykron’s havoc, lockdown announced in the Netherlands
इतर सर्व दुकानं, शिक्षणसंस्था, हॉटेल्स, संग्रहालयं, चित्रपटगृह आणि प्राणी संग्रहायलयं बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.कोरोना व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या भीतीने डच सरकारने देशात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.
नेदरलँड्स पुन्हा लॉकडाउनमध्ये लावावा लागतोय याचं मला दु:ख आहे, असं नेदरलँडचे पंतप्रधान रुट्टे यांनी म्हटलं आहे.रविवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 5 वाजल्यापासून नवा लॉकडाऊन लावण्यात आला असून १४ जानेवारी २०२२ पर्यंत लागू असेल.
ओमायक्रॉनमुळे देशाला कोरोनाच्या पाचव्या लाटेचा सामना करावा लागणारआहे, आम्हाला कडक लॉकडाऊन लागू करावा लागेल, असं रुट्टे यांनी म्हटलं आहे.ख्रिसमसनंतर नेदरलँडमध्ये ओमायक्रॉनचा धोका वाढेल, असा दावा तिथल्या तज्ज्ञांनी व्यक्त केला. आहे. त्यामुळे खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Omaykron’s havoc, lockdown announced in the Netherlands
महत्त्वाच्या बातम्या
- टीइटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित
- अफगाणिस्तान : काबुलवरून खास विमान दिल्लीला उतरले ; भरताद्वारे ११० जणांची अफगाणिस्तानातून सुटका
- संतोष परब यांच्यावर हल्ला करणारे चार हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात ; हल्ल्याची दिली कबुली
- Indian Army high Level Meeting : सीडीएस रावत अपघात सैन्याच्या 7 कमांडरांची दिल्लीत मोठी बैठक