• Download App
    सिंधू जल करारात इस्लामी देशांची संघटना OIC ची लुडबुड, पाकिस्तानच्या बाजूने केली खुडबुड, भारताचा घेतला वेगळ्याच कारणासाठी "बदला"!!

    सिंधू जल करारात इस्लामी देशांची संघटना OIC ची लुडबुड, पाकिस्तानच्या बाजूने केली खुडबुड, भारताचा घेतला वेगळ्याच कारणासाठी “बदला”!!

    नाशिक : भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात भारताने आपला वैध अधिकार वापरून सिंधू जल करार स्थगित केला. त्यामुळे पाकिस्तानला भीषण जलटंचाईला सामोरे जावे लागले. तरी देखील पाकिस्तानने आपली राजकीय मस्ती सोडली नाही. पाकिस्तान नसून सिंधू जल कराराच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून बोंब‌ मारायला लागला. याचीच प्रचिती ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज (OIC) या संघटनेच्या व्यासपीठावर आली. एरवी फक्त काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानची बाजू उचलून धरणाऱ्या OIC संघटनेने सिंधू जल काराराच्या बाबतीत पाकिस्तानची बाजू उचलून धरली. भारताला सिंधू जल काराराचे पालन करण्याचा उपदेश केला.

    तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल मध्ये झालेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजच्या (OIC) बैठकीत संघटनेच्या 51 सदस्यांनी सदस्य देशांनी पाकिस्तानची बाजू उचलून धरली. काश्मीर मधल्या जनतेच्या मताच्या आधारे तो प्रश्न सोडवावा ही नेहमीची टिमकी तर संघटनेने वाजवलीच, पण त्याचबरोबर सिंधू जल कराराचा मुद्दा अजेंड्यावर आणला, जो आधी कधीही संघटनेच्या अजेंड्यावर नव्हता. भारत आणि पाकिस्तान यांनी शांततेच्या मार्गाने द्विपक्षीय समस्या सोडवाव्यात. काश्मीर प्रश्नावर काश्मिरी जनतेचे मत प्राधान्याने लक्षात घ्यावे. त्याचबरोबर सिंधू जल कराराचे पालन दोन्ही देशांनी जसेच्या तसे करावे, अशा सूचना ओ आय सी च्या सदस्य देशांनी केल्या.

    OIC च्या बैठकीपूर्वी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर हे तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांना भेटले होते. त्या दोघांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेस पडसाद OIC सदस्य देशांच्या सूचनेत पडले. या सगळ्या देशांनी पाकिस्तानची बाजू उचलून धरून भारतालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

    – भारताची रशियाकडून तेल आयात म्हणून…

    पण प्रत्यक्षात वेगळ्याच मुद्द्यावर या देशांनी भारताचा “बदला” घेतला. भारताने गेल्या काही वर्षांमध्ये OIC सदस्य देशांमधल्या तेल उत्पादक देशांवरचे भारताचे अवलंबित्व कमी केले. त्या देशांकडून खनिज तेलाची आयात कमी केली. त्यांच्या ऐवजी रशियाकडून खनिज तेल आयात वाढवली. त्यामुळे OIC च्या तेल उत्पादक सदस्य देशांच्या आर्थिक हितसंबंधांना मोठा धक्का बसला. त्याचा “बदला” OIC या सदस्य देशांनी वेगळ्या पद्धतीने घेतला. सिंधू जल कराराचा द्विपक्षीय मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठाच्या ऐरणीवर आणला. OIC ने पाकिस्तानच्या दहशतवादाविषयी चकार शब्द काढला नाही, पण भारताला सिंधू जल कराराचे पालन करायच्या सूचना केल्या.

    OIC calls for ‘strict adherence’ to IWT

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही