• Download App
    लठ्ठपणाने ग्रासलेल्या लहान मुलांवर कोरोनाचे गंभीर परिणाम, नव्या अभ्यासात इशारा|Obese children faces problems due to corona

    लठ्ठपणाने ग्रासलेल्या लहान मुलांवर कोरोनाचे गंभीर परिणाम, नव्या अभ्यासात इशारा

    विशेष प्रतिनिधी

    सिडनी – लठ्ठपणाने ग्रासलेल्या लहान मुलांवर कोरोनाचे गंभीर परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून दिसून आले. कॅनडा, इराण आणि कोस्टारिका येथील ४०० कोरोनाग्रस्त मुलांचा अभ्यास केल्यानंतर त्यात गंभीर आजारी असणाऱ्या मुलांपैकी बहुतेकांना लठ्ठपणाचा त्रास असल्याचे आढळून आले.Obese children faces problems due to corona

    विशेषतः १२ वर्षांवरील मुलांमध्ये हे प्रमाण अधिक होते. कोरोनाची बाधा झालेल्या मुलांमध्ये लठ्ठपणा हेच अत्यवस्थ होण्याचे प्रमुख कारण ठरत असल्याचे या अभ्यासात निदर्शनास आले. ऑस्ट्रेलियात आयसीयूमध्ये दाखल कराव्या लागलेल्या दोन तृतीयांश कोरोनाग्रस्त मुलांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले.



    तर अमेरिकेत देखील सुमारे ४३,००० रुग्णालयांचा अभ्यास केल्यानंतर लठ्ठपणा आणि मधुमेहाचा त्रास असलेल्या मुलांना कोरोना झाल्यावर रुग्णालयात दाखल करावे लागण्याची शक्यता वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.

    प्रमाणापेक्षा अधिक वजन आणि लठ्ठपणा यामुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिकारशक्तीला मर्यादा येत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच तणावाचा रक्तवाहिन्यांवरील परिणाम आणि जळजळ यांमुळे लठ्ठपणाचा त्रास असलेल्या मुलांमध्ये किडनीचा त्रास, रक्ताच्या गुठळ्या, हृदयविकाराचा झटका आदी गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते.

    Obese children faces problems due to corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या