• Download App
    पंजशीर प्रांतात तालिबानवर पुन्हा प्रतिआक्रमण करण्याचा एनआरएफच्या नेत्याचा इशारा NRFA will take panjashir in hand once again

    पंजशीर प्रांतात तालिबानवर पुन्हा प्रतिआक्रमण करण्याचा एनआरएफच्या नेत्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – पंजशीर प्रांतात तालिबानच्या विरोधात उभे ठाकलेल्या नॅशनल रेझीस्टन्स फोर्सने व्यूहात्मक माघार घेतल्याचा दावा केला आहे. ६० टक्के भाग अजूनही आपल्या नियंत्रणात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लवकरच प्रतिआक्रमण करू असा इशाराही त्याने दिला NRFA will take panjashir in hand once again

    एनआरएफचा नेता अली नझारी याने एका परदेशी संकेतस्थळाला माहिती दिली. त्यानुसार पंजशीर खोऱ्याची भौगोलिक रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. तेथे हल्ला करणाऱ्या कोणत्याही एका आक्रमकास पूर्ण भाग ताब्यात घेणे अशक्य असते, कारण अनेक लहान खोऱ्यांचा यात समावेश आहे, ज्यातील ६० ते ६५ टक्के लहान खोऱ्यांवर आणि व्यूहात्मक ठिकाणांवर आमचे अजूनही नियंत्रण आहे, असेही त्याने ठामपणे सांगितले.

    हा प्रांत गमावल्याचा दावा त्याने खोडून काढला. तालिबानचे मोठे नुकसान झाल्याचे त्याने नमूद केले. पंजशीरमधील सध्याची परिस्थिती बातम्यांच्या तुलनेत जास्त गुंतागुंतीची आहे. तालिबानने केवळ मुख्य मार्ग ताब्यात घेतला आहे. प्रांताचे केंद्र त्यापासून जवळ आहे. त्यामुळेच तालिबान्यांना तेथे त्यांचा झेंडा फडकावता आला

    NRFA will take panjashir in hand once again

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Trump said : ट्रम्प म्हणाले- आम्ही भारत-पाक अणुयुद्ध रोखले; दोन्ही देशांना समजावले; दोघांनीही सहमती दर्शवली

    व्यापाराचे हत्यार वापरून अमेरिकेनेच भारत – पाकिस्तानचे अणुयुद्ध थांबविले, अन्यथा लाखो लोक मेले असते; मोदींच्या भाषणाआधी डोनाल्ड ट्रम्प यांचे निवेदन!!

    Russian President Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची युक्रेनला चर्चेची ऑफर; युरोपीय देशांच्या धमकीनंतर आला प्रस्ताव