विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : जगातील प्रसिध्द अब्जाधिश रिचर्ड ब्रॅन्सन संस्थापक असलेली व्हर्जीन गॅलक्टिक ही कंपनी आता अंतराळ पर्यटन सुरू करणार आहे. दररोज किमान एक अंतराळ भ्रमण सहल काढण्याची कंपनीची योजनाआहे. यासाठी कंपनी ५०० दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारणार आहे. यासाठी अमेरिकन सिक्युरिटी एक्सचेंज कमिशनकडे प्रस्तावही दाखल केला आहे.Now space tourism, Virgin Galactic Company plans to take a daily space trip
नुकतेच ब्रॅन्सन यांनी आपल्या काही कर्मचाऱ्यांसह अंतराळ सहल यशस्वीपणे पूर्ण केली होती. त्याच्या दुसºयाच दिवशी त्यांनी ही घोषणा केली आहें. आता या स्पेस टूरिझम कंपनीन प्रत्येक स्पेसपोर्टमधून वर्षाला 400 उड्डाणे करण्याचे लक्ष ठेवले आहे. पुढील काळात या व्यवसायाला खूप चांगले दिवस येणार आहेत,
असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल कोलगॅझियर यांनी सांगितले. ते म्हणाले, कंपनी आणखी दोन प्रायोगिक उड्डाणे करणार आहे. त्यानंतर व्यावसायिक तत्वावर प्रवाशांना अंतराळ सफर घडविण्यात येईल.
२०२२ मध्ये सहाशे प्रवाशांची प्रतिक्षा यादी आहे. आतापर्यंत ८० मिलीयन डॉलर्स किंमतीची तिकिटे विकली गेलीआहे. त्याचबरोबर एक हजार लोकांनी प्रत्येकी एक हजार डॉलर्सची अनामत रक्कम तिकिटे खरेदी करण्यासाठी ठेवली आहे.
स्टारशिप टू स्पेस प्लेनमध्ये अवघ्या चार प्रवाश्यांसाठी जागा असून, कोलगॅझियर म्हणाले की व्हर्जिन गॅलॅक्टिकची दोन नवीन स्पेसशिप बनविण्याची योजना आखण्यात आली आहे. देखभालीसाठी सोप्य असणाºया या स्पेसशिपमुळे दररोज उड्डाणेकरणे शक्य होणार आहे.
Now space tourism, Virgin Galactic Company plans to take a daily space trip
महत्त्वाच्या बातम्या
- श्रीनगरच्या गुपकार चौकात डौलात फडकला तिरंगा…!!
- माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अ नुसार गुन्हे नोंदवू नका, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राज्यांना सूचना
- रेल्वे स्टेशन की विमानतळ, गुजरातमधील गांधीनगर स्टेशनवर चक्क फाईव्ह स्टार हॉटेल
- ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेत्री करिना कपूरविरुध्द तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी
- ‘छोट्या माणसा’ला शरद पवारांनी घरी बोलावलेच नाही, नाना पटोले यांनी केला खुलासा