विशेष प्रतिनिधी
काबूल: पंजशीर खोऱ्यात तालीबानला नॉर्दन अलायन्सकडून कडवा प्रतिकार होत आहे. तालीबानने सर्व शक्तीनिशी पंजशीर खोऱ्यावर हल्ला चढविला. मात्र, तालीबानला येथे जबरदस्त दणका बसला असून ६०० तालीबानी या हल्यात ठार झाले आहेत. एक हजारांहून अधिक तालिबानींना अटक करण्यात आली आहे.Northern Alliance strikes Taliban in Panjshir Valley, killed 600 Taliban
अफगाणिस्तानचा ताबा मिळवला तरी तालिबानसमोर नव्याने संकटे उभी राहिली आहेत. पंजशीर प्रांतावर तालिबानला ताबा मिळवता आला नाही. याआधीदेखील १९९६ ते २००१ दरम्यानच्या तालिबानी राजवटीतही पंजशीर प्रांत स्वतंत्र होता. त्यामुळे यावेळेस पंजशीरवर ताबा मिळवण्यासाठी तालिबानकडून प्रयत्न सुरू आहेत.
तालिबानने या प्रांतावर ताबा मिळवल्याचा दावा केला होता. मात्र, अमरुल्लाह सालेह यांनी हा दावा फेटाळून लावला. पंजशीरमधील संघषार्बाबत नॉर्दर्न अलायन्स आणि तालिबानकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत आहे. पंजशीरमध्ये जोरदार कारवाई सुरू असून खिंज आणि उनाबा जिल्ह्यांवर ताबा मिळवला असल्याचा दावा तालिबानने केला आहे.
पंजशीरची राजधानी बाजारक आणि प्रांतीय राज्यपाल भवनाच्या परिसराकडे जाणाऱ्या मार्गांवर भुसुरुंग असल्यामुळे कारवाईला वेळ लागत असून सात पैकी चार जिल्ह्यांवर ताबा मिळवला असल्याचा दावा तालिबानने केला आहे. नॉर्दर्न अलायन्सचे नेते अहमद मसूद यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
अफगाणिस्तानमध्ये सत्तास्थापन करण्याचा निर्णय तालिबानने आठवडाभरासाठी पुढे ढकलला आहे. आंतरराष्ट्रीय समूहाची मान्यता मिळू शकेल, असे सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे, अशी माहिती प्रवक्ता झैबीउल्लाह मुजाहिद याने शनिवारी दिली.
Northern Alliance strikes Taliban in Panjshir Valley, killed 600 Taliban
महत्त्वाच्या बातम्या
- South Africa Riots : दक्षिण आफ्रिकेत भारतवंशीयांकडून भयंकर हिंसाचार, डझनभर कृष्णवर्णीयांचा मृत्यू
- पवारांनी कुठे पाठीत खंजीर खुपसला दाखवा?, असे म्हणणाऱ्या संजय राऊतांना चंद्रकांतदादांचा “या” अभ्यासाचा सल्ला
- Bengal By-Poll : ममता बॅनर्जी भवानीपूरमधून निवडणूक लढवणार, टीएमसीची घोषणा- ‘भाजपने उमेदवार उभे करून पैसे वाया घालवू नये’
- Farmers Protest : राकेश टिकैत यांच्या वक्तव्यावर अनुराग ठाकूर यांचा पलटवार, म्हणाले- सरकारने 11 वेळा चर्चा केली, काही जण भ्रम पसरवत आहेत