विशेष प्रतिनिधी
स्टॉकहोम – नोकिया कंपनीने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. तसा पर्याय खुला करण्यात आला. Nokia gives permission for workers for work from home
घरून काम करण्याचे धोरण गेल्या डिसेंबरमध्ये बंद करण्यात आले, पण जानेवारीपासून कामाच्या तासात सोईनुसार बदल करण्यास मुभा देण्यात आली. रेनॉ आणि स्टेलॅंटीस या मोटारउत्पादक कंपनीने तीन दिवस घरून कामाबाबत कर्मचाऱ्यांशी करार केले आहेत.
नोकियाची कार्यालयांच्या इमारतीत फेरबदल करण्याचीही योजना आहे. काही ठिकाणी ७० टक्के जागा सांघिक उपक्रम आणि बैठकांसाठी देण्यात येईल, तेथे कामासाठी आरक्षित जागा कमी असेल. डलास, सिंगापूर, बुडापेस्ट येथील कार्यालयांमध्ये यापूर्वीच फेरबदल करण्यात आले आहेत. इतर ठिकाणी यंदाच्या वर्षाच्या अखेरीस पूरक बदल केले जातील.
नोकियाचे १३० देशांत सुमारे ९२ हजार कर्मचारी आहेत. येत्या दोन वर्षांत दहा हजार कर्मचारी कमी करण्याची योजना आहे. खर्च कमी करून संशोधन क्षमता वाढविण्यासाठी जास्त गुंतवणूक करण्याचे धोरण असल्याचे यंदा मार्च महिन्यात सांगण्यात आले.
Nokia gives permission for workers for work from home
महत्त्वाच्या बातम्या