• Download App
    ब्रिटनमध्ये दहा महिन्यात प्रथमच कोरोनाचा एकही बळी नाही No single death in Briton due to corona

    ब्रिटनमध्ये दहा महिन्यात प्रथमच कोरोनाचा एकही बळी नाही

    विशेष प्रतिनिधी

    लंडन – ब्रिटनमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युला आता चांगलाच ‘ब्रेक’ लागला आहे. ब्रिटनमध्ये गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे एकाचाही मृत्यु न होणे ही घटना दहा महिन्यात प्रथमच घडली आहे. No single death in Briton due to corona

    मात्र तज्ञांनी ब्रिटन सरकारला तिसऱ्या लाटेचा इशारा  दिला असून २१ जून रोजी संपूर्णपणे निर्बंध काढून घेण्याचा निर्णय तीन चार आठवडे लांबणीवर टाकावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

    दुसरीकडे ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून काल ३१६५ जणांना कोरोनाची लागण झाली. कोरोना डेल्टा व्हेरियंट हा संपूर्ण ब्रिटनमध्ये पसरत आहे. हा स्ट्रेन भारतात आढळून आला होता. गेल्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णात किरकोळ वाढ नोंदली गेली. या ठिकाणी मे महिन्याच्या प्रारंभी दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण सापडत होते.



    आता हाच आकडा चार हजारावर गेला आहे. १ जून रोजी ३१६५ जणांना बाधा झाली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४४.९० लाख जणांना बाधा झाली तर ४२.९१ लाख लोक बरे झाले. यादरम्यान २७,७८२ जणांचा मृत्यू झाला. सध्या ७१,१६९ जणांवर उपचार सुरू आहेत.

    No single death in Briton due to corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shehbaz Sharif : पाक पंतप्रधानाची दर्पोक्ती- काश्मीर पाकिस्तानचा भाग बनेल, काश्मिरींसोबत खंबीरपणे उभे, हा प्रदेश पाकची जीवनवाहिनी

    Shocking Epstein Files : एपस्टीनच्या नव्या फाइल्समध्ये दावा-मुलींना जबरदस्तीने प्रेग्नंट केले; लैंगिक संबंधांदरम्यान महिलांचा गळा दाबला; मृतदेह फार्म हाऊसमध्ये पुरले

    Trump Outrage : ट्रम्प यांनी ओबामा आणि त्यांच्या पत्नीला माकड म्हटले; 2020 च्या निवडणुकीत गैरव्यवहाराचा आरोप