• Download App
    अमेरिकेने टाकले एक पाउल पुढे, लस घेतलेल्यांना आता नाही मास्कची गरज नाही|No mask compulsion in USA

    अमेरिकेने टाकले एक पाउल पुढे, लस घेतलेल्यांना आता नाही मास्कची गरज नाही

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनी मास्क वापरण्याची आवश्यगकता नाही, असे अमेरिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाने (सीडीसी) जाहीर केले आहे. यामुळे जनजीवन सुरळीत करण्याच्या दिशेने अमेरिकेने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे.No mask compulsion in USA

    अमेरिकेत ११४ दिवसांमध्ये लशीचे २५ कोटी डोस नागरिकांना दिले गेले आहेत. अमेरिकेत लसीकरणाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून देशातल्या ५० पैकी ४९ राज्यांमध्ये रुग्णसंख्या वेगाने घटत आहे.



    रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या कोरोगा रुग्णांची संख्या प्रचंड कमी झाली असून मृत्यूचे प्रमाणही ८० टक्क्यांनी कमी झाले आहे.‘कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना संसर्गाचा अत्यंत कमी धोका आहे.

    त्यामुळे अमेरिकेने एक मोठे पाऊल टाकले आहे. देशातील लसीकरणाला वेग आणल्याने आपल्याला हे यश मिळाले आहे,’ असे बायडेन यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र, ज्यांनी अद्याप लस घेतली नसेल,

    किंवा लशीचा एकच डोस घेतला असेल, त्यांनी मास्कचा वापर करणे आवश्य क आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.या ‘सीडीसी’ने ही घोषणा केल्यानंतर काही वेळानेच झालेल्या एका पत्रकार परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस हे विनामास्क दाखल झाले.

    No mask compulsion in USA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप