बायडेन सध्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत.
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : गाझा युद्धात अमेरिका इस्रायलच्या पाठीशी उभी असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या युद्धात इस्रायलला शक्य ती सर्व मदत करत आहेत. मात्र बायडेन पहिल्यांदाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात बोलले आहेत.Netanyahus Approach To Gaza War Is Hurting Israel More Than Helping Joe Biden
एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी MSNBC प्रसारित केलेल्या एका मुलाखतीदरम्यान बायडेन म्हणाले की, इस्रायली नेते बेंजामिन नेतन्याहू यांचा गाझामधील युद्धाचा दृष्टीकोन “इस्राएलला मदत करण्यापेक्षा इस्रायलचे अधिक नुकसान करत आहे.”
बायडेन सध्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. यादरम्यान, ते म्हणाले, “नेतन्याहू यांना इस्रायलचे रक्षण करण्याचा अधिकार आहे… हमासच्या हल्लेखोरांचा पाठलाग सुरू ठेवण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांनी उचललेल्या पावलांमुळे निष्पाप जीव जात आहे, त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. एक लाल रेषा असणे अत्यंत महत्वाचे आहे.”