• Download App
    इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याच्या पुतण्याला न्यूझीलंडमध्ये अटक, अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप|Nephew of Indira Gandhi's killer arrested in New Zealand, accused of drug trafficking

    इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याच्या पुतण्याला न्यूझीलंडमध्ये अटक, अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप

    वृत्तसंस्था

    ऑकलंड : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या पुतण्याला न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मार्च 2023 मध्ये मनुकाऊ येथे टाकलेल्या छाप्यात 328 किलो मेथॅम्फेटामाइन जप्त केले होते. हे ड्रग्ज बिअरच्या बाटल्यांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते.Nephew of Indira Gandhi’s killer arrested in New Zealand, accused of drug trafficking

    या छाप्यात पोलिसांनी एका व्यक्तीलाही अटक केली आहे. चौकशीत त्याने आपले नाव बलतेज सिंग असल्याचे सांगितले. तपासात समोर आले की, तो सतवंत सिंगचा पुतण्या आहे, ज्याने ऑपरेशन ब्लू स्टारनंतर 1984 मध्ये त्याच्या साथीदार बेअंत सिंगसह मिळून इंदिरा गांधी यांची हत्या केली होती.



    सतवंत सिंग यांचा भाऊ 1980 मध्ये न्यूझीलंडमध्ये स्थलांतरित झाला

    इंदिरा गांधींच्या हत्येपूर्वीच 1980 मध्ये सतवंत सिंग यांचा भाऊ कुटुंबासह न्यूझीलंडला गेला होता. ऑकलंडमध्ये त्याने ग्रोसरी स्टोअर सुरू केले. मात्र, सतवंत सिंग यांचा पुतण्या असल्याने ऑकलंडमधील स्थानिक गुरुद्वारांमध्ये बलतेजचे खूप लक्ष होते.

    न्यूझीलंडमध्ये बलतेज सिंगची मालमत्ता अचानक वाढू लागली तेव्हा शेजाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. बलतेजचे वडील रे व्हाईट नावाच्या रिअल इस्टेट फर्मचे मालक झाले. त्याने 100 कोटींहून अधिक किमतीचे घरही विकत घेतले आहे. अटकेपूर्वी बलतेज फर्मचे काम पाहत होता.

    बलतेज हा खलिस्तान समर्थक निदर्शनांचा सूत्रधार

    वृत्तसंस्था एएनआयला सूत्रांनी सांगितले की, बलतेज सिंग हा न्यूझीलंडमधील भारतविरोधी आणि खलिस्तान समर्थक निदर्शनांमागील सूत्रधार आहे. याद्वारे तो पैसे गोळा करतो. सध्या तो तुरुंगात असून त्याच्यावर अमली पदार्थ तस्करीचा खटला सुरू आहे.

    Nephew of Indira Gandhi’s killer arrested in New Zealand, accused of drug trafficking

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या