• Download App
    बेकायदेशिर अफगाणींना वैतागून नेपाळने घेतला हा निर्णय, आता भारतीय नागरिकांचा प्रवेशही होणार अवघड|Nepal took this decision, now it will be difficult for Indian citizens to enter

    बेकायदेशिर अफगाणींना वैतागून नेपाळने घेतला हा निर्णय, आता भारतीय नागरिकांचा प्रवेशही होणार अवघड

    विशेष प्रतिनिधी

    काठमांडू : भारतातून बेकायदेशिरपणे येणाऱ्या अफगाण नागरिकांना रोखण्यासाठी नेपाळ सरकारने आता भारतीयांच्या प्रवेशावर निर्बंध लावले आहेत. आतापर्यंत कोणत्याही निबंर्धाशिवाय थेट रस्त्याने नेपाळमध्ये प्रवेश करणाºया भारतीयांना आता नेपाळमध्ये प्रवेश करताना, ओळखपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.Nepal took this decision, now it will be difficult for Indian citizens to enter

    नेपाळ प्रशासनाचे गृहमंत्री बाळकृष्ण खांड यांनी भारतीय नागरिकांच्या नेपाळमधील प्रवेशासाठी नवीन नियम लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. नेपाळच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीच्या शिफारशीनंतर नेपाळच्या काळजीवाहू पंतप्रधानांसह गृहमंत्री खांड यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे.



    नेपाळमध्ये प्रवेश करताना भारतीय नागरिकांचे ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. खुल्या सीमेचा फायदा घेऊन तिसºया देशाचे नागरिक नेपाळमध्ये सहज प्रवेश करतात, त्यामुळे नेपाळच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. अलीकडेच 11 अफगाण नागरिक भारतातून नेपाळमध्ये दाखल झाले. त्याच्याकडे भारतीय ओळखपत्रही होते,

    पण ती सर्व ओळखपत्रे बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अफगाणिस्तानातील नागरिकांकडून बनावट आधार कार्ड मिळाल्यानंतर दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या अफगाण नागरिकांनी पंजाबमधून आधारकार्ड मिळवल्याचे नंतर तपासात निष्पन्न झाले.

    Nepal took this decision, now it will be difficult for Indian citizens to enter

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या