• Download App
    NATO Nations Distance Themselves from US Israel Strikes on Iran VIDEOS इराणवरील हल्ल्यामुळे ट्रम्प पडले एकाकी, नाटो देशांनी राखले अंतर; इतिहासात पहिल्यांदाच इराण-इराक अमेरिकेविरुद्ध एकत्र

    NATO : इराणवरील हल्ल्यामुळे ट्रम्प पडले एकाकी, नाटो देशांनी राखले अंतर; इतिहासात पहिल्यांदाच इराण-इराक अमेरिकेविरुद्ध एकत्र

    NATO

    वृत्तसंस्था

    तेहरान : NATO इराणविरुद्ध अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईनंतर नाटो देश अमेरिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत असल्याचे दिसून येते. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनसारख्या प्रमुख नाटो देशांनी या हल्ल्यापासून स्वतःला दूर ठेवले. स्पेन व नॉर्वेनेही या कारवाईच्या वैधतेवर आक्षेप घेतला. तथापि, कॅनडा व ऑस्ट्रेलियाने पाठिंबा व्यक्त केला. इतिहासात प्रथमच इराण आणि इराक यांनी अमेरिकेविरुद्ध एकत्र आले आहेत.NATO

    फ्रान्स या कारवाईत सहभागी नव्हता. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तणाव कमी करण्याची आणि अणुचर्चा पुन्हा सुरू करण्याची गरज यावर भर दिला. जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी स्पष्ट केले की जर्मनीने हल्ल्यात भाग घेतला नाही आणि सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी सांगितले की युनायटेड किंग्डम लष्करी कारवाईचा भाग नव्हता.NATO



    स्पॅनिश पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी या हल्ल्याला एकतर्फी पाऊल म्हटले. नॉर्वेजियन परराष्ट्रमंत्री एस्पेन बार्थ ईडे यांनीही हल्ल्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी सांगितले की इराणच्या अणुकार्यक्रमाबद्दलच्या चिंता गंभीर आहेत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले, इराणच्या अणू महत्त्वाकांक्षांना आळा घालणे आवश्यक असून प्रादेशिक सुरक्षा लक्षात घेऊन पावले उचलली पाहिजेत.

    बॉम्बरवरून वाद… इराक इराणसोबत हवाई डेटा शेअर करतोय

    इराण व इराक शेजारी असूनही एकेकाळी शत्रू. त्यांच्यातील तेल वर्चस्वासाठीची लढाई जुनी आहे. परंतु ताज्या युद्धामुळे दोन्ही शेजारी अमेरिकेविरुद्ध उभे राहिले आहेत. अमेरिकन बी-२ बॉम्बर्स इराकी हवाई हद्द वापरून इराणमध्ये गेले, ज्यामुळे इराक संतप्त झाला आहे. इराकने हे आपल्या सार्वभौमत्वाचे उघड उल्लंघन मानले आहे आणि आपल्या हवाई दलाला सतर्क केले आहे. त्यांच्या सैन्याने अमेरिकन हवाई तळाला वेढा घालण्यास सुरुवात केली आहे. इराक आपल्या भूभागाचा हवाई डेटा इराणसोबत शेअर करत आहे.

    बी-२ बॉम्बरने जमिनीखाली लपलेल्या क्षेपणास्त्रांचा स्फोट

    अमेरिकेने पुन्हा इराणविरुद्ध बी-२ बॉम्बरचा वापर केला. पेंटागॉनचे प्रतिनिधी जेनिफर ग्रिफिन म्हणाले, रविवारी चार बी-२ स्पिरिट बॉम्बरने थेट अमेरिकेतून उड्डाण केले व तेहरानच्या बाहेरील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळांवर २००० पौंड वजनाचे डझनभर बॉम्ब टाकले. ही क्षेपणास्त्रे भूमिगत बंकरमध्ये साठवली होती. हे बॉम्ब जीबीयू-३१ जॉइंट डायरेक्ट अटॅक म्युनिशन आहेत, जे अमेरिका १९९९ मध्ये कोसोवो युद्धापासून वापरत आहे. एक बी-२ बॉम्बर असे १६ बॉम्ब वाहून नेऊ शकतो. हे बॉम्ब ६ फूट जाडीच्या काँक्रीटच्या थरात सहजपणे प्रवेश करू शकतात.

    NATO Nations Distance Themselves from US Israel Strikes on Iran VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Grok AI : AIने आधीच सांगितली होती इराणवर हल्ल्याची तारीख, Elon Musk यांनीही सांगितली ही बाब

    US Military : इराणवरील हल्ल्यात अँथ्रोपिक AIचा वापर; लक्ष्य ओळखण्यात मदत घेतली; व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना पकडण्यातही याच टूलची भूमिका होती

    Afghanistan : अफगाणिस्तानचा पाकिस्तानच्या नूरखान एअरबेसवर हल्ला; तालिबानचे मंत्री म्हणाले- आम्ही ड्युरंड लाइन ओलांडली