ISISने या ठिकाणी झालेल्या गोळीबार आणि बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी शुक्रवारी रात्री मॉस्कोमधील कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. यासोबतच त्यांनी राष्ट्रीय शोक दिवस जाहीर केला आहे. क्रोकस सिटी हॉलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोक बळी पडले, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. National mourning in Russia over terrorist attack in Moscow Putin said swear that I will not forgive the attackers
पुतीन म्हणाले की, क्रोकस सिटी हॉल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करतील. या हल्ल्यामागे जे कोणी असतील, मी शपथ घेतो की त्यांना सोडले जाणार नाही. तसेच, बंदूकधाऱ्यांनी युक्रेनच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला.
मॉस्कोमधील क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजन करणयात आले होते. तर दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अँड इराक (ISIS) ने या ठिकाणी झालेल्या गोळीबार आणि बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली आहे.
या भीषण दहशतवादी हल्ल्यात 93 जणांचा मृत्यू झाला असून 145 जण जखमी झाले आहेत. ISIS ने आपल्या चॅनलवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आमच्या योद्ध्यानी रशियाची राजधानी मॉस्कोच्या बाहेरील क्रोकस कॉन्सर्ट हॉलवर हल्ला केला. तसेच ISIS ने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, हल्लेखोर सुरक्षितपणे त्यांच्या ठिकाणी परतले.
National mourning in Russia over terrorist attack in Moscow Putin said swear that I will not forgive the attackers
महत्वाच्या बातम्या
- भाजपची चौथी यादी जाहीर, 15 नावे; यात पुद्दुचेरीची 1 जागा आणि तामिळनाडूच्या 14 उमेदवारांची नावे
- आता मुइज्जूंच्या डोक्यात पडला प्रकाश, आर्थिक संकटात भारतासमोर हात पसरवला
- हिमाचल प्रदेशातील तीन आमदारांनी दिला राजीनामा
- दिल्ली दारू घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार अरविंद केजरीवालांना 28 मार्चपर्यंत ED कोठडी; दिल्ली सरकार चालण्यावर प्रश्नचिन्ह!!