• Download App
    नासाची मंगळावरच ऑक्सिजनची निर्मिती ; परग्रहावर वास्तव्याचे मानवी स्वप्न पूर्ण होणार |NASA produces oxygen on Mars

    नासाची मंगळावरच ऑक्सिजनची निर्मिती ; परग्रहावर वास्तव्याचे मानवी स्वप्न पूर्ण होणार

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ ने मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार केला. मंगळावरील कार्बन डायऑक्साइडमधून हा ऑक्सिजन तयार केला आहे.NASA produces oxygen on Mars

    पेरसेवेरेसन्स रोव्हर 18 फेब्रुवारीला मंगळावर उतरले होते. मंगळवरचे वातावरण पृथ्वीपेक्षाही वेगळे आहे. त्यामुळे तेथे ऑक्सिजन निर्मितीचे आव्हान होते. रोव्हरमधून नासाने ‘मॉक्सि’ (MOXIE) हे खास उपकरण मंगळावर पाठवले होते.



    त्यातून ऑक्सिजन तयार केला जात आहे. हे उपकरण टोस्टरच्या आकाराचे असून 5 ग्रॅम ऑक्सिजन तयार होतो. हा 5 ग्रॅमचा ऑक्सिजन अंतराळवीर 10 मिनिटांसाठी श्वास घेण्यासाठी वापरू शकतात.

    परग्रहावर ऑक्सिजन तयार करता येणे ही विशेष बातमी आहे. ऑक्सिजन निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली तर मानवाला परग्रहावर वस्ती करणे सोपे जाणार आहे.

    NASA produces oxygen on Mars

    Related posts

    China : चीनने म्हटले- अमेरिकेने जपानमधून टायफून क्षेपणास्त्र प्रणाली काढावी; यामुळे प्रदेशाच्या सुरक्षेला धोका

    Trump : ब्रिटनच्या शाही राजवाड्यात ट्रम्प यांचे भव्य स्वागत; किंग चार्ल्ससोबत सोन्याच्या बग्गीतून प्रवास

    Nepal : नेपाळमध्ये 6 पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हटवण्याची मागणी; जेनझी आंदोलकांनी म्हटले- जुने चेहरे सहन करणार नाही