• Download App
    निघृण दडपशाहीनंतरही म्यानमारवर अजून निर्बंध नाहीच, संयुक्त राष्टांत केवळ चर्चेचे नाटक |Myanmar will face strict action

    निघृण दडपशाहीनंतरही म्यानमारवर अजून निर्बंध नाहीच, संयुक्त राष्टांत केवळ चर्चेचे नाटक

    विशेष प्रतिनिधी 

    यांगून  : म्यानमारमधील दडपशाहीची जगाने आता गंभीर दखल घेण्यास सुरुवात कली असून कदाचित येत्या काळात या देशात कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.Myanmar will face strict action

    म्यानमारमधील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत चर्चा झाली. अमेरिका आणि युरोपीय देशांनी म्यानमारवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र त्यावर कोणताच निर्ण झालेला नाही



    म्यानमारवर आंतरराष्ट्रीय समुदायाने निर्बंध घालावेत आणि तेथे ‘नो फ्लाय झोन’ जाहीर करावा, अशी मागणी म्यानमारच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूतांनी आज केली. नमारमधील लष्करी प्रशासनाने आंदोलनकर्त्यांविरुद्ध कारवाई सुरू ठेवली आहे. यात शनिवारी किमान १२ जणांचा मृत्यू झाला.

    लष्करी राजवटीने संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूताला देशात येण्यास मज्जाव केला आहे. क्यू मोई टुन हे म्यानमारचे संयुक्त राष्ट्रांतील प्रतिनिधी आहेत. देशातील सत्ताबदलानंतर लष्करी राजवटीने त्यांना प्रतिनिधी मानण्यास नकार दिला आहे.

    मात्र आपणच खरे प्रतिनिधी असल्याचा दावा करत टुन यांनी म्यानमारमधील घडामोडींत सुरक्षा समितीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. शेकडो जणांचा बळी गेल्यानंतरही संयुक्त राष्ट्रांनी कारवाई न केल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

    Myanmar will face strict action

    हे ही वाचा

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या