INS चेन्नई बचावासाठी रवाना, नौदलाची विमाने जहाजावर लक्ष ठेवून आहेत
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमालियाच्या किनार्याजवळ एमव्ही लीला नॉरफोक या जहाजाचे अपहरण केल्याप्रकरणी मोठे पाऊल उचलले असून आयएनएस चेन्नईला त्या दिशेने पाठवले आहे. अपहरण झालेल्या जहाजाच्या क्रू मध्ये 15 भारतीय सदस्यांचाही समावेश आहे.MV Leela Norfolk ship hijacke in Somalia 15 Indian crew members on board
वृत्तसंस्था एएनआयने लष्करी अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस चेन्नई अपहरणाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अपहरण झालेल्या जहाजाच्या दिशेने जात आहे. यापूर्वी लष्करी अधिकाऱ्याने सांगितले होते की, ‘भारतीय नौदल अपहरण झालेल्या ‘एमव्ही लीला नॉरफोक’ या जहाजावर बारीक लक्ष ठेवून आहे, याची माहिती गुरुवारी संध्याकाळी मिळाली.
सोमालियाच्या किनार्याजवळ अपहरण करण्यात आलेल्या लायबेरियन ध्वजांकित जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स होते. भारतीय नौदलाची विमाने जहाजावर लक्ष ठेवून आहेत आणि चालक दलाशी संवाद प्रस्थापित झाला आहे.
MV Leela Norfolk ship hijacke in Somalia 15 Indian crew members on board
महत्वाच्या बातम्या
- इंडिगोचे फ्लाइट तिकीट होणार स्वस्त, 1000 रुपयांनी कमी होऊ शकते किंमत, इंधन शुल्क आकारणार नाही
- चिनी माध्यमांनी केले भारताच्या प्रगतीचे कौतुक, भारत आत्मविश्वासने भरलेला, मोदींच्या नेतृत्वात वेगाने प्रगती
- “रामाच्या विषयात अडकू नका” म्हणत शरद पवारांची महाविकास आघाडीत तिसऱ्या वरून किमान दुसऱ्या स्थानावर जाण्याची धडपड!!
- अयोध्येतील ऐतिहासिक श्री रामजन्मभूमी मंदिराची ‘ही’ वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत का?