विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली जिहादी आंदोलनातून देशाची सत्ता बळकवणारे नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांचे आसन डळमळीत झाले आहे, तरी देखील त्यांनी बांगलादेश दिनाच्या निमित्ताने चीनमध्ये जाऊन भारताविरुद्ध गेमा केल्यात. Mohammad Yunus’s seat in doubt in Bangladesh
बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली जिहादी आंदोलकांनी शेख हसीना यांची सत्ता उलटवली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला अधिमान्यता मिळवून घेण्यासाठी नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांच्याकडे देशाच्या सल्लागार पदाची सूत्रे सोपवली. परंतु मोहम्मद युनूस यांनी पहिल्यापासूनच भारताविरुद्ध गेमा सुरू केल्या. त्यामध्ये त्यांच्या चीन दौऱ्यामध्ये भर पडली. चीनमध्ये जाऊन मोहम्मद युनूस यांनी त्याचा विरुद्ध गरळ ओकली. भारताच्या सेव्हन सिस्टर म्हणजे भारतातील ईशान्येकडची सात राज्ये लँडलाक आहेत, तर बंगाली उपसागराचे आम्ही एकमेव रखवालदार आहोत. त्यामुळे चीनने आमच्याकडे एक गुंतवणूक डेस्टिनेशन म्हणून पाहावे, असे उद्गार मोहम्मद युनूस यांनी काढले त्यांनी चीनचे अध्यक्ष यांच्याशी वाटाघाटी केल्या.
एकीकडे मोहम्मद युनूस यांची भारताकडून मदतीची अपेक्षा आहे, पण दुसरीकडे भारताविरुद्ध चीनच्या बळावर गेमा करायच्या असाही त्यांचा डाव आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप मोहम्मद युनूस यांच्या दौऱ्याबद्दल कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही, तरी देखील मोहम्मद युनूस यांचे बांगलादेशातले आसन डळमळीत झाल्याच्या बातम्या समोर आल्यात. ज्या दिवशी मोहम्मद युनूस चीनच्या दौऱ्यावर गेले, त्याच दिवशी अमेरिकेचे उप लष्करप्रमुख जोएल पी. वावेल बांगलादेशात आले. त्यांनी बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार उज झमान यांच्याशी वाटाघाटी केल्या. अमेरिका आणि बांगलादेश यांच्या सैन्याच्या संयुक्त सरावाविषयी चर्चा केली. पण त्या पलीकडे जाऊन बांगलादेशात मोहम्मद युनूस यांना बाजूला करून शेख हसीना यांना परत सत्तेवर बसवायचे किंवा लष्करी प्रभावाखालचे अंतरिम राष्ट्रीय सरकार बनवायचे यावर खऱ्या अर्थाने वाटाघाटी झाल्याचे बोलले जात आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेश हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींवर “सोपवून” दिला आहे. मोदी बांगलादेशाच्या संदर्भात जो निर्णय घेतील, तो अमेरिका मान्य करेल, असे ट्रम्प यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे मोहम्मद युनूस यांनी चीनमध्ये जाऊन भारताला विरोधात कितीही गेमा केल्या आणि वक्तव्ये केली, तरी मूळातच बांगलादेशात त्यांचे आसन डळमळीत आहे. त्यामुळे त्यांच्या निमंत्रणावर विसंबून राहून चीन बांगलादेशात कितपत गुंतवणूक करेल, याविषयी आंतरराष्ट्रीय वर्तुळात दाट शंका व्यक्त होत आहे.
Mohammad Yunus seat in doubt in Bangladesh
महत्वाच्या बातम्या
- Tamil Nadu तामिळनाडूमध्ये भाजप मोठ्या आघाडीच्या तयारीत!
- आधुनिक काळात कुटुंब व्यवस्था धोक्यात, ही राष्ट्रहिताच्या दृष्टीने धोक्याची घंटा; सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळेंचा इशारा!!
- Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये 17 नक्षली ठार; यात 11 महिला, कुख्यात कमांडरही मारला गेला
- Myanmar : म्यानमारमध्ये २४ तासांत १५ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले