वृत्तसंस्था
वॉशिंग्टन – भारत आणि अमेरिकेने दहशतवादाविरोधात एकत्रित लढा देण्याचा निर्धार केला आहे. मुंबईवर २६/११ रोजी भीषण हल्ला घडवून आणणाऱ्या सूत्रधारांवर कारवाई केली जावी असे मत मांडण्यात आले.Modi – Biden acte unitlly against terrorism
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या भेटीनंतर हे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले.अफगाणिस्तानात सध्या सत्ताधारी बनलेल्या तालिबान्यांनी त्यांच्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होऊ देता कामा नये असेही उभय देशांकडून बजावण्यात आले.
सर्वच दहशतवादी संघटना आणि समूह यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देतानाच सीमेपलीकडून चालणाऱ्या दहशतवादी कारवायांचाही कठोर शब्दांत निषेध करण्यात आला. पाकिस्तानने दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई करावी आणि मुंबईवर हल्ला करणाऱ्यांचा निवाडा करावा असे आग्रही मत मांडले.
Modi – Biden acte unitlly against terrorism
महत्त्वाच्या बातम्या
- UNGA मधील मोदींचे संपूर्ण भाषण : संयुक्त राष्ट्रांत पंतप्रधानांनी दहशतवाद, कोरोना आणि अफगाणिस्तानसह या मुद्द्यांवर मांडले मत! वाचा सविस्तर…
- तालिबान इम्रान खानला म्हणाला कठपुतळी , अफगाणिस्तान प्रकरणापासून दूर राहण्याचा दिला सल्ला
- पालघरमधील प्रकार, दलितांच्या अंतयात्रेच्या वेळी गोंधळ करणाऱ्या तीन लोकांना अटक