वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नडेला (Satya Nadella) आणि त्यांची पत्नी अनु यांचा मुलगा झेन नडेला यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तो २६ वर्षांचा होता.त्याला जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी या आजारानं ग्रासलं होतं. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये झेनच्या निधनासंबंधी सांगितलं आहे. या संदेशात अधिकाऱ्यांना नडेला कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास सांगितलं आहे.Microsoft CEO Satya Nadella’s son Zain Nadella passes away
२०१४ मध्ये सीईओपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर नडेला यांनी दिव्यांग व्यक्तींना उत्तम सेवा देण्यासाठी कंपनीचं प्रोडक्ट डिझाईन करण्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं होतं. यासाठी त्यांनी आपला मुलगा झेनचं उदाहरणही दिलं होतं. मागील वर्षी द चिल्ड्रन हॉस्पीटलनं (या ठिकाणी झेनवर उपचार करण्यात आले होते) नडेलाज यांना जॉईन केलं होतं. आता सिएटल चिल्ड्रेन सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह ब्रेन रिसर्चचा भाग म्हणून झेन नडेला एडेड चेअर इन पॅडेट्रिक न्यूरोसायन्सची स्थापना केली जाणार आहे.
“झेनला संगीताची खुप आवड होती. त्याचं हास्य आणि आपलं कुटुंब आणि प्रियजनांसाठी त्यानं दिलेला आनंद कायमच लक्षात ठेवला जाईल,” अशी प्रतिक्रिया मुलांच्या रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ स्परिंग यांनी आपल्या संचालक मंडळाला लिहिलेल्या संदेशाद्वारे दिली.
झैनला ‘सेरेब्रल पाल्सी’चा त्रास होता. सत्या यांनी ऑक्टोबर २०१७ च्या ब्लॉग पोस्टमध्ये मुलाच्या या आजारासंदर्भात भाष्य केलं होतं.
“अनु गरोदर असताना ३६ व्या आठवड्यामध्ये अचानक एका रात्री तिला गर्भामध्ये बाळ हलचाल करत नसल्याचं लक्षात आलं. याबद्दल तिला आश्चर्य वाटलं. आम्ही त्यावेळी बेलीव्हू येथील स्थानिक रुग्णालयाच्या आपत्कालीन सेवा मिळणाऱ्या केंद्रात धाव घेतली. हे एखादं रुटीन चेकअप असेल असं वाटलेलं. नवीन पालक म्हणून आम्हाला थोडं बैचन व्हायलाही होत होतं. खरं तर मला आपत्कालीन सेवेसाठी लागणारा वेळ आणि पहावी लागणारी वाट यामुळे फार अस्वस्थ व्हायला झालेलं. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी तातडीने सीझेरियन पद्धतीने प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. झैनचा जन्म १३ ऑगस्ट १९९६ रोजी ११ वाजून २९ मिनिटांनी झाला. तो जन्माला आल्यानंतर रडला नाही,” असं सत्या यांनी ब्लॉगमध्ये लिहिलेलं.
“झैनला नंतर त्या रुग्णालयामधून वॉशिंग्टन आणि नंतर सिएटलमधील मुलांच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. दुसरीकडे अनु प्रसुतीनंतर रिकव्हर होतं होती. मी रात्रभर तिच्यासोबत असायचो आणि नंतर दुसऱ्या दिवशी झैनला भेटण्यासाठी जायचो. आमचं आयुष्य कायमचं बदलून जाईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. पुढील काही वर्षांमध्ये आम्हाला गर्भशयामध्ये श्वास अडकल्याने बाळाला झालेल्या त्रासासंदर्भात अधिक माहिती मिळाली. त्यानंतर झैनला व्हिलचेअरची गरज भासणार याची आम्हाला जाणीव झाली. तो नंतर ‘सेरेब्रल पाल्सी’मुळे कायम आमच्यावर निर्भर असणारं हे सुद्धा जाणवलं. यामुळे मी पूर्णपणे निराश झालेलो.
सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय (Cerebral Palsy)
हॉस्पिटलच्या सीईओने त्यांच्या बोर्डाला दिलेल्या संदेशात लिहिले की झैन त्याच्या संगीतावरील प्रेम आणि त्याच्या सुंदर हास्यासाठी लक्षात राहील. 2017 मध्ये, सत्या नाडेला यांचे एक पुस्तक आले ज्यामध्ये त्यांनी सेरेब्रल पाल्सी ग्रस्त असलेल्या त्यांच्या मुलाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख केला. सेरेब्रल पाल्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो मुलाच्या हालचाली आणि फिरण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. ckbhospital.com च्या मते, सेरेब्रल पाल्सी ही मुलांमधील मेंदू आणि स्नायूंची समस्या आहे. हा आजार तीन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 1,000 पैकी दोन ते तीन मुलांमध्ये आढळतो. एका सर्वेक्षणानुसार, भारतातील सुमारे 500,000 मुले आणि प्रौढ या आजाराने ग्रस्त आहेत. हा आजार मेंदूच्या काही भागाला झालेल्या दुखापतीमुळे होतो, जो लहान मुलांमध्ये सर्वात सामान्य मोटर रोगांपैकी एक आहे. हा रोग संसर्गजन्य नाही आणि प्रगतीशील नाही. जरी ही लक्षणे सर्व मुलांमध्ये भिन्न असू शकतात.
सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने सांगितले की, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांचा मुलगा झैन नाडेला यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. तो 26 वर्षांचा होता आणि त्याला जन्मापासून सेरेब्रल पाल्सी होता.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ नडेला यांनी 2014 पासून अपंग वापरकर्त्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी उत्पादने डिझाइन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा झैन यांचे संगोपन आणि समर्थन करताना त्यांनी बरेच काही शिकले आहे. सिएटल चिल्ड्रन्स सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह ब्रेन रिसर्चचा भाग म्हणून बालरोग न्यूरोसायन्सेसमध्ये झैन नडेला एंडॉव्ड चेअर सादर करण्यासाठी गेल्या वर्षी, चिल्ड्रन हॉस्पिटलने नडेलासोबत सहकार्य केले.