• Download App
    फुटबॉलचा बादशहा लिओनेल मेस्सी आणि बर्सिलोनाचे नाते संपुष्टात, क्रीडा जगतात खळबळ |Messi will not now play for Barcilona club

    फुटबॉलचा बादशहा लिओनेल मेस्सी आणि बर्सिलोनाचे नाते संपुष्टात, क्रीडा जगतात खळबळ

    विशेष प्रतिनिधी

    बार्सिलोना – फुटबॉलचा बादशहा लिओनेल मेस्सी आणि बार्सिलोना हे दोन दशके रुढ असलेले समीकरण आता संपले आहे. मेस्सी आता बार्सिलोनाचा खेळाडू नसेल असे बार्सिलोना क्लबने जाहीर करताच क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे. मेस्सीला आता कोणता क्लब करारबद्ध करणार याकडे लत्र लागून राहणार आहे.Messi will not now play for Barcilona club

    वयाच्या १८ वर्षापासून मेस्सी बार्सिलोना क्लबकडून खेळलेला आहे. मेस्सीने बार्सिलोनाबरोबरचा अखेरचा करार सप्टेंबर २०१७ मध्ये केला होता त्यानुसार दरवर्षाला त्याला १८ कोटी ८० लाख युरो मिळत होते. कोरोना काळात बार्सिलोनाने मेस्सीसह सर्व खेळाडूंच्या करारात कपात केली होती.



    नव्याने करार व्हावा असे बार्सिलोना आणि मेस्सी या दोघांना वाटत होते, परंतु आर्थिक रक्कमेवरून दोघेही एकमेकांपासून दूर झाले आहेत.मेस्सीचा बार्सिलोनाबरोबरचा करार कोपा अमेरिका स्पर्धा सुरू असतानाच संपला होता. बार्सिलोना क्लबची आर्थिक चणचण असल्यामुळे मेस्सीला अपेक्षित रक्कम ते देऊ शकत नव्हते.

    Messi will not now play for Barcilona club

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या