बीजिंग : चीनमधील मध्य हेनान प्रांतात पडत असलेल्या तुफान पावसाने पूर आला असून आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या भागात एक हजार वर्षांत यंदा प्रथमच अतिवृष्टी झाली आहे.Massive rain in China
झेंगझाऊ शहराच्या मध्यवर्ती भागात २४ तासांत ४५७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चीनमध्ये हवामानाच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात झाली तेव्हापासूनचा हा सर्वांत मोठा पाऊस आहे, असे ‘शिन्हुआ’ या वृत्तसंस्थेने सांगितले. हेनान प्रांतात अनेक सांस्कृतिक स्थळे आहेत.
उद्योग व शेती हे येथील मुख्य व्यवसाय आहे. बौद्ध भिख्खूंच्या मार्शल आर्टसाठी प्रसिद्ध असलेले शाओलिन मंदिराचेही पुरामुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.झेंगझाऊ येथील पुरामुळे लुयांग शहरातील धरणाला २० मीटर लांबीचा तडा गेला असून धरण कोणत्याही क्षणी फुटण्याची भीती ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने ‘सिना विबो’ या सोशल मीडिया व्यासपीठावरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून व्यक्त केली होती.
धरणातील पाण्याचा फुगवटा होऊ नये म्हणून हे धरण फोडून त्यातील पाणी बाहेर सोडण्यात आले. हे काम मंगळवारी (ता. २०) रात्रीपासून सुरू झाले होते.सर्व भागात ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे (पीएलए) सैनिक तैनात करण्याचा आदेश शी जिनपिंग यांनी दिला
असून नागरिकांची सुरक्षा आणि मालमत्तेला सर्वोच्च प्रधान्य देण्याचे निर्देश दिले. यानुसार ‘पीएएल’च्या सेंट्रल थिएटर कमांडने हेनान प्रांतात तातडीने सैनिकांच्या तुकड्या पाठविल्या.
Massive rain in China
महत्त्वाच्या बातम्या
- अभिनेता सचिन जोशीने जिंकला राज कुंद्राविरोधातील खटला, १८ लाख रुपयांचे सोने मिळणार परत
- निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचा तपास करण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी, उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले
- राज कुंद्राला अश्लिल चित्रपट इंडस्ट्री बॉलवूडइतकीच मोठी करायची होती
- लोकल बंदीमुळे हैराण मुंबईकरांच्या संतापाला राज ठाकरे यांनी फोडली वाचा, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आता सहन करण्याची क्षमता संपत चालली
- केंद्राकडून व्हेंटिलेटर्सचे वाटप होऊनही राज्यांनी रुग्णालयांना पुरविलेच नाहीत