• Download App
    Tesla Cybertruck डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर टेस्ला सायबर ट्रकमध्ये मोठा स्फोट

    Tesla Cybertruck : डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर टेस्ला सायबर ट्रकमध्ये मोठा स्फोट

    या भीषण स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    न्यू ऑर्लिन्स : अमेरिकेत पुन्हा एकदा एक दुर्घटना घडली आहे. आधी न्यू ऑर्लिन्समध्ये एका माथेफिरूने अनेकांना ट्रकने चिरडले आणि आता लास वेगासमध्ये स्फोट झाला आहे. ट्रम्प टॉवरच्या बाहेर हा स्फोट झाला. टेस्ला कंपनीच्या सायबर ट्रकमध्ये हा स्फोट झाला.

    एफआयबी याचा एखाद्या दहशतवादी घटनेप्रमाणे तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लास वेगासमधील ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या बाहेर टेस्ला सायबर ट्रक उभा होता. ज्यात स्फोट झाला. या स्फोटात चालकाचा मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले आहेत. एफबीआय या प्रकरणाचा दहशतवादी घटना म्हणून तपास करत आहे.

    Sharad Pawar : गुरुने दिला शरणागतीचा वसा; चला पुतण्याच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसा!!

    हे लक्षात घेण्यासारखे आहे की ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलचे मालक अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत, तर टेस्लाचे मालक एलोन मस्क आहेत. इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प हे खास मित्र आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सायबर ट्रकचा स्फोट कसा झाला हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सायबर ट्रक जळून खाक झाला आहे.

    Massive explosion in Tesla Cybertruck outside Donald Trumps hotel

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Russian Oil : रशिया म्हणाला- भारतावर रशियन तेल न खरेदी करण्याचा दबाव; अमेरिकेला ऊर्जा पुरवठ्यावर नियंत्रण हवे

    Russia : रशियात भारतीय विद्यार्थ्यांच्या शोषणाचे प्रकार वाढले; 2025 मध्ये जगभरात 350 तक्रारी, त्यापैकी 200 रशियातून

    US EXILE Act : अमेरिकन संसदेत H-1B व्हिसा रद्द करणारे विधेयक सादर; भारतीयांवर सर्वाधिक परिणाम होईल