सहा गावे नष्ट झाली असून शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.
विशेष प्रतिनिधी
कंधार : अफगाणिस्तानात काल झालेल्या भीषण भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. वृत्तसंस्था एपीने तालिबानच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, भूकंपामुळे आतापर्यंत देशात दोनन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर हजारो लोक जखमी झाले आहेत. Massive destruction in Afghanistan due to earthquake more than 2 thousand people died so far
हा भूकंप दोन दशकांतील सर्वात भयंकर भूकंपांपैकी एक आहे. तत्काळ मदतीचे आवाहन करताना देशाच्या माहिती आणि संस्कृती मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल वाहिद रायन यांनी सांगितले की, भूकंपामुळे सुमारे सहा गावे नष्ट झाली असून शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. देशातील ४६५ घरे जमीनदोस्त झाली असून १३५ घरांचे नुकसान झाले आहे.
भूकंपाच्या संदर्भात संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे की, देशातील मृतांची संख्या आणखी वाढू शकते, कारण शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोसळलेल्या इमारतींखाली काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपत्ती प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद अब्दुल्ला जान यांनी सांगितले की, हेरात प्रांतातील जेंडा जान जिल्ह्यातील चार गावांचे भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
Massive destruction in Afghanistan due to earthquake more than 2 thousand people died so far
महत्वाच्या बातम्या
- बंगळुरूमध्ये भीषण दुर्घटना, फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू
- Earthquake : अफगाणिस्तानमध्ये ३० मिनिटांत ३ शक्तिशाली भूकंप, १४ मृत्यू, ७८ जखमी
- दहशतवादी रिझवान अश्रफचे ‘सपा’ नेत्याशी आढळले कनेक्शन, तपास यंत्रणांनी छापेमारी सुरू केली
- Asian Games 2023 : भारताने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास, आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच जिंकले सुवर्णपदक