वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या पोलिसावर गुन्हा सिद्ध झाला आहे. त्याला २३वर्ष आणि सहा महिने अशी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. Led to the assassination of George Floyd Convicted policeman sentenced to 22 years
डेरेक चॉविन,असे पोलिसाचं नाव आहे. गेल्या वर्षी जॉर्ज फ्लॉयड यांची या पोलिसाने हत्या केली होती. निव्वळ संशयावरून डेरेकने जॉर्ज यांच्या मानेवर गुडघ्याचा दाब दिला होता. या दाबामुळे गुदमरून जॉर्ज यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी न्यायाधीश पीटर काहील याने मिनियापोलिस राज्याच्या कायद्यात नमूद असलेल्या १२ वर्षं आणि ६ महिन्यांहून अधिकची शिक्षा ठोठावली. या सुनावणीवेळी डेरेकवर आपल्या अधिकार आणि पदाचा गैरवापर करणे तसंच जॉर्जसोबत क्रूरता दाखवणे, असा ठपका ठेवला.
त्यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत प्रक्षोभ उसळला होता. अमेरिकेत वर्णभेद पूर्णतः नष्ट न झाल्याची टीका झाली होती. डेरेकला याहून अधिक शिक्षा द्यायला हवी होती, अशी सामान्यांची मागणी आहे. अर्थात एखाद्या कृष्णवर्णीय व्यक्तिच्या हत्येसाठी एवढी मोठी शिक्षा होणारी डेरेक ही पहिलीच व्यक्ती आहे.
Led to the assassination of George Floyd Convicted policeman sentenced to 22 years
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनाविषयी गुप्तचर यंत्रणा सतर्क, पाकिस्तानी ISI करू शकते हिंसा भडकवण्याचा प्रयत्न
- कौतुकास्पद ! स्वप्नांना पंख ! नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा;कोंढ्याच्या 14 वर्षीय लेकीची गगनभरारी;अमेरिकेत उडवलं विमान !
- जनक… आरक्षणाचे, सहकाराचे, शिक्षण क्रांतीचे अन् समाज परिवर्तनाचे!
- कोरोना चाचणीचे कीट फक्त ५० रुपयांत; आयआयटी दिल्लीच्या संशोधकांची निर्मिती
- Corona Vaccine : कोरोनापासून बचावासाठी दरवर्षी ‘बूस्टर डोस’ आवश्यक ;जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट