- अशा परिस्थितीत किम जोंग उन यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
विशेष प्रतिनिधी
उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी आपल्या सैन्याला शत्रूच्या कोणत्याही चिथावणीला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात उत्तर कोरियाने एक गुप्तचर उपग्रह सोडला होता. तेव्हापासून कोरियन द्वीपकल्पात तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत किम जोंग उन यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत.Kim Jong Un orders military to be ready Know what caused increased stress
उत्तर कोरियाच्या माध्यमांनी शुक्रवारी सांगितले की किम जोंग यांनी दक्षिण कोरियाच्या सीमेवर मजबूत सशस्त्र सेना आणि नवीन शस्त्रे तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. न्यूज एजन्सी केसीएनएने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अलीकडेच किम जोंग यांनी हवाई दलाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी लष्कराला कोणतेही युद्ध लढण्यासाठी त्यांची क्षमता वाढवण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्याचबरोबर शत्रूच्या कोणत्याही लष्करी चिथावणीला आणि धोक्याचा तत्काळ आणि ताकदीने मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना किम यांनी दिल्या आहेत.
उत्तर कोरिया मध्ये अन्न धान्याची कमतरता! तानाशाह किम जोंग उन म्हणातात, 2025 पर्यंत कमी जेवण घ्या
सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये किम आणि त्यांची मुलगी एकत्र दिसले. रिपोर्टनुसार, कार्यक्रमात एक एअर शो आयोजित करण्यात आला होता, जिथे ते दोघे सहभागी होण्यासाठी आले होते. ज्यामध्ये लढाऊ विमानांनी त्यांचे कौशल्य दाखवले. वृत्तानुसार, हवाई दलाच्या तयारीने किम प्रभावित झाले आणि त्यांनी यासाठी हवाई दलाचे कौतुकही केले.
Kim Jong Un orders military to be ready Know what caused increased stress
महत्वाच्या बातम्या
- Madhya Pradesh Exit Poll : मध्य प्रदेशात कोणाचे सरकार? भाजपची कायम राहणार सत्ता! पाहा महानिकालाचा अंदाज
- Rajasthan Exit Poll : राजस्थानात भाजपची सत्ता, जवळपास सर्वच पोलमध्ये काँग्रेसची निराशा
- आता ‘या’ राज्यात पेपरफुटीप्रकरणी जन्मठेप आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंड!
- म्यानमारमधून मिझोराममध्ये पळून आलेल्या आणखी 30 सैनिकांना मायदेशी परत पाठवले