वृत्तसंस्था
तेहरान : इराणमध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात कोणत्याही उमेदवाराला पन्नास टक्क्यांहून जास्त मते मिळाली नाहीत. आता देशात ५ जुलैला फेरमतदान होणार आहे. या निवडणुकीत इराणच्या जनतेने कट्टरवादी नेते व सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे निकटवर्तीय सईदी जलिली यांना नाकारले आहे. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. पहिल्या क्रमांकावर एकमेव सुधारणावादी डॉ. मसूद पेजेशकियन राहिले. सुधारणावादी मसूद यांना सर्वाधिक ४२.४ टक्के म्हणजे सुमारे १ कोटी ४० लाख मते मिळाली. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले जलिली यांना ३८.६ टक्के (सुमारे ९४ लाख) मते मिळाली. रुढीवादी उमेदवार व संसदेचे विद्यमान अध्यक्ष जनरल मोहंमद बाकर गालिब तिसऱ्या स्थानी राहिले. त्यांना ३३ लाख (१३.८ टक्के) मते मिळाली. जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांवरील असंतोषामुळे केवळ ४० टक्के एवढेच यंदा मतदान झाले.Khamenei’s hardliners lose, reformists win in Iran election, top two face off after failing to get 50 percent of votes
एकमेव सुधारणावादी नेते मसूद हे सुधारणावादी तरुणांची पहिली पसंती ठरले आहेत. व्यवसायाने कार्डियाक सर्जन मसूद इराणचे आरोग्यमंत्री राहिले आहेत. त्यांना इराणचे माजी राष्ट्रपती मोहंमद खातमी यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या निवडीनंतर पश्चिमेकडील देशांशी आण्विक मुद्यांवर चर्चेची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. इस्रायल वगळता कोणताही करार करण्याची मसूद यांची तयारी आहे. परंतु ५ जुलै रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत मसूद यांची वाट कठीण दिसते.
निवडणूक प्रचारात पहिल्यांदाच हिजाब बंदीची चर्चा
इस्लामिक राष्ट्र बनल्यापासून इराणमध्ये पहिल्यांदाच निवडणुकीत हिजाब बंदीसारखे मुद्दे चर्चेत राहिले. त्यात एकमेव मसूद यांचा प्रचार हिजाब विरोधावर आधारित होता. २०२२ मध्ये इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन झाले. त्यावेळी सरकारने बळाचा वापर केला होता. या घटना अद्यापही जनतेच्या मनात आहेत. हा निवडणूक प्रचाराचा मोठा मुद्दा वाटला. या निवडणुकीत भ्रष्टाचार, पश्चिमेकडील देशांवरील निर्बंध, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य, कुशल कामगारांचे पलायन रोखण्याचे मुद्दे पहिल्यांदाच चर्चिले गेले.
राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत मसूद वगळता सगळेच खामेनी यांचे समर्थक मानले जातात. त्यातही जलिली सर्वाधिक निकटवर्तीय मानले जातात. ते अमेरिकेसोबतच्या आण्विक चर्चेसाठी ओळखले जातात. त्याचबरोबर जलिली अतिकट्टरवादी पेदारी पक्षाचे नेतृत्व करतात. ते देशांतर्गत व परराष्ट्र पातळीवर सर्वात कट्टरवादी विचारांचे प्रतिनिधित्व करतात. इराणला प्रगती करण्यासाठी अमेरिकेशी चर्चा करण्याची गरज नाही, असे जलिली यांना वाटते.
Khamenei’s hardliners lose, reformists win in Iran election, top two face off after failing to get 50 percent of votes
महत्वाच्या बातम्या
- राधाराणी वादप्रकरणी पं. प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी, दुसऱ्याला म्हटले होते राधाचा पती
- केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहार तुरुंगात राहणार; मद्य धोरणप्रकरणी CBIने केली होती अटक
- T20 world cup 2024 winner : टीम इंडियाने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवले, सूर्याच्या एका कॅचने फिरवली मॅच
- चेहऱ्याचा मुद्दा राऊतांनी घट्ट धरला; पवारांना बाजूला सारून राहुलच्या नावाने गूळ लावला!!