• Download App
    Khalistani भारतात हिंसाचार घडवण्यासाठी खलिस्तान्यांनी कॅनडाची भूमी वापरली; कॅनडियन गुप्तहेर संघटनेच्या अहवालात प्रथमच कबुली!!

    भारतात हिंसाचार घडवण्यासाठी खलिस्तान्यांनी कॅनडाची भूमी वापरली; कॅनडियन गुप्तहेर संघटनेच्या अहवालात प्रथमच कबुली!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅनडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडा यांच्या त्या संबंधांमध्ये नेमका काय बदल झाला हे दोन्ही देशांमध्ये नियमित राजदूत नेमण्याच्या निर्णयावरून पुढे आले पण त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाची बाब बदलली. पण ती काहीशी दुर्लक्षित राहिली, ती म्हणजे भारतात हिंसाचार घडविण्यासाठी खलिस्तान्यांनी कॅनडाची भूमी वापरली अशी कबुली कॅनडियन गुप्तहेर संघटनेने आपल्या अहवालात प्रथमच दिली. कॅनडियन गुप्तहेर संघटनेने “खलिस्तानी” हा शब्द त्यात प्रथमच वापरला.

    वास्तविक आत्तापर्यंत कॅनडाच्या कुठल्याच सरकारने खलिस्तानी हा शब्द फुटीरतावादी या अर्थाने वापरला नव्हता. कॅनडाच्या सरकारने खलिस्तानचे स्वातंत्र्य युद्ध भारतात सुरू आहे. भारताच्या सरकारशी आणि राज्य व्यवस्थेची खलिस्तानी स्वतंत्र देशासाठी लढत आहेत अशी भूमिका जस्टिन ट्रूडो यांच्या सरकारने घेतली होती. त्यामुळे खलिस्तानी मनोवृत्तीचे लोक कॅनडात भारताविरुद्ध वाटेल तशी गरळ ओकत होते.

    पण आता कॅनडातल्या गुप्तहेर संघटनेने खलिस्तानी दहशतवाद्यांचे काळे कारनामे आपल्या अहवालात नमूद केले. 1980 पासून खलिस्तानी लोकांनी कॅनडामध्ये बस्तान बसवले. अनेकांनी सुरुवातीला खलिस्तानच्या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलने केली त्यामुळे त्याचे भयानक रूप त्यावेळी समोर आले नाही. पण त्यांच्यातल्याच एका गटाने हिंसक मार्गांचा अवलंब केला. त्यासाठी कॅनडाची भूमी वापरली. त्यांनी अनेक युवकांचे घातक मतपरिवर्तन केले. त्यांना हिंसाचारासाठी चिथावणी दिली. कॅनडाची गुप्तहेर संघटना CSIS खलिस्तानी दहशतवाद्यांच्या या घातक कारवायांवर नजर ठेवून आहे, असे अहवालात नमूद केले आहे. कॅनडा सरकारच्या बदलत्या धोरणाचा हा अहवाल मोठा निदर्शक ठरला आहे. इथून पुढे कॅनडातल्या खलिस्तानी फुटीरतावाद्यांवर तिथले सरकार कठोर कारवाई करण्याची अपेक्षा आहे.

    Khalistani ‘extremists’ use Canada for violence in India says, Canadian Intel

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही