विशेष प्रतिनिधी
दुबई : संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका भारतीयासह दहा जणांना ४० कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. रंजित सोमराजन (वय ३७) असे या युवकाचे नाव असून तो अबुधाबी येथे वाहनचालक म्हणून काम करतो. गेल्या तीन वर्षांपासून तो लॉटरीचे तिकीट खरेदी करत आहे.Kerala youth won 40 crore lottery
लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठीही पैसे नसल्याने त्याने इतर नऊ लोकांना गोळा केले आणि प्रत्येकाने समान प्रमाणात पैसे भरत रंजितच्या नावाने तिकीट खरेदी केले होते. आता लॉटरीचे ४० कोटी रुपये हे सर्व दहा जण वाटून घेणार आहेत.
सध्या वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या रंजिथ याने चांगले पैसे मिळण्यासाठी अनेकदा नोकऱ्या बदलल्या आहेत. वाहनचालक म्हणून काम करतानाच सेल्समनचेही तो काम करत असे. मात्र, पगार कमी असल्याने अनेकदा अडचणी येत होत्या, असे त्याने सांगितले. आता लॉटरीतून मिळणाऱ्या पैशांनी चांगले आयुष्य जगता येईल, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.
मूळ केरळचा असलेला रंजित हा अबुधाबीमध्ये २००८ पासून रहात आहे. आपण ‘बिग टिकेट जॅकपॉट’चे विजेते ठरू असे स्वप्नातही वाटले नव्हते, मी कायम दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर लक्ष ठेवून असे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
Kerala youth won 40 crore lottery
विशेष प्रतिनिधी
- निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करत भाजपाच्या आठ नेत्यांची फेरमतमोजणीची मागणी, कोलकत्ता उच्च न्यायालयात याचिका
- कॉँग्रेसमधील सी म्हणजे कनींग- धूर्त, भाजपाची बी टीम असल्याच्या आरोपावर बसपच्या मायावती यांचा कॉँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
- बांग्ला देशाची आंबा डिप्लोमसी, शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून पाठविले २६०० किलो आंबे
- अटकेच्या भीतीने अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळण्याची मागणी
-