• Download App
    कमला हॅरिस आणि अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या स्नेहभोजनात दिसला "मोदी भारता"चा प्रभाव!!|Kamala and Modi bond: State Dept comes alive with the India-America connection

    कमला हॅरिस आणि अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या स्नेहभोजनात दिसला “मोदी भारता”चा प्रभाव!!

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात काल अखेरच्या दिवशी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाप अमिट राहिली. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने दिलेले स्नेहभोजनात “मोदी भारता”चा विशेषत्वाने प्रभाव दिसला, त्याचवेळी कमला हॅरिस भारताच्या आठवणीत देखील रमल्या.Kamala and Modi bond: State Dept comes alive with the India-America connection

    कमला हॅरिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या स्नेहभोजनात भारताच्या जागतिक प्रभावाचे कौतुक केले.

    उपाध्यक्षा कमला हॅरिस या आपल्या आईच्या आठवणीतही रमल्या. त्यांची आई 1958 मध्ये अमेरिकेत आली, तेव्हा फोन सहज उपलब्ध नव्हते आणि म्हणून त्या नियमितपणे घरी पत्रे लिहायच्या. त्यांनी कधीही भारताशी संबंध तोडला नाही. त्यांनी ते संबंध कायम जिवंत ठेवले. हजारो मैलांचे अंतर असूनही तिने तिचे भारतीय आणि अमेरिकन जीवन जोडण्यासाठी सर्व मार्गांचा वापर केला, अशी आठवण कमला हॅरिस यांनी सांगितली.



    यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्स्फूर्तपणे कमला हॅरिस यांना, आणि आज आपण या संबंधांना नवी उंची दिली आहे, असे गौरव उद्गार काढले. तुमचे यश भारतातील आणि जागतिक स्तरावरील महिलांसाठी अभिमानास्पद आहे. तुम्ही त्यांना प्रेरणा द्या, असे मोदी म्हणाले.

    कमला हॅरिस या पहिल्या भारतीय – अमेरिकन, पहिल्या आफ्रिकन – अमेरिकन अमेरिकेच्या उपाध्यक्ष बनलेल्या पहिल्या महिला आहेत आणि आता 2024 मध्ये जो बायडेन यांच्यानंतर त्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.

    पंतप्रधान मोदींना उत्तर देताना कमला हॅरिस म्हणाल्या, भारत हा आईच्या आणि आमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग होता आणि आहे. आई श्यामा गोपालन तिला मद्रासला घेऊन गेल्याचे कमला हॅरिसना आठवले. मद्रास मध्ये त्यांनी आजोबा आणि काका यांच्याबरोबर केलेल्या गमती जमती आठवल्या.

    आजोबा आणि काका यांच्याकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्याची आठवण हॅरिस यांनी मोदींना सांगितली. काका आणि आजोबा यांनी कमला हॅरिस यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अनेक महानायकांच्या गोष्टी सांगितल्या त्या आजही त्यांना आठवत आहेत.

    कमला हॅरिस म्हणाल्या, काका आणि आजोबांशी झालेल्या चर्चेतूनच आपल्या लोकशाही कशी असावी आणि ती कशी टिकवावी याची मूलभूत मूल्य मिळाली आजोबा, काका आणि आई यांच्याकडून मी खूप धडे शिकले आणि त्यामुळेच आज अमेरिकेची उपराष्ट्राध्यक्ष या रूपात मी आपल्यासमोर उभी आहे.

    मोदींच्या सन्मानासाठी दिलेल्या स्नेहभोजनात परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी देखील मोदींच्या 30 वर्षांपूर्वीच्या अमेरिका भेटीची आठवण सांगितली. त्यावेळी मोदी पहिल्यांदा परराष्ट्र मंत्रालयातील एक्सचेंज कार्यक्रमांतर्गत अमेरिकेला आले होते. ते त्यावेळी कोणत्याही पदावर नव्हते तर भाजपचे साधे कार्यकर्ते होते.

    मोदींनी 2014 मध्ये तत्कालीन उपाध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या मेजवानीची आठवण करून दिली. त्या वेळी, बायडेन भारत – अमेरिका भागीदारी हे भविष्य असेल, असे म्हणाले होते. तेव्हापासून भारत – अमेरिका यांचे नातेसंबंध अधिक दृढ झाले ते केवळ अमेरिकेच्या आश्वासनापुरते उरले नाहीत, तर त्यापलीकडे प्रत्यक्ष कृतीत आणि जागतिक प्रभावात त्याचे रूपांतर झाले, असे स्पष्ट मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले.

    कमला हॅरिस यांनी देखील मोदींच्या या मताला दुजोरा दिला. आत्तापर्यंतच्या आपल्या जागतिक प्रवासात भारत जागतिक पातळीवर कसा प्रभावशाली देश बनला आहे याची अनेक उदाहरणे आपण पाहिली. अमेरिका खंड, युरोप म, आफ्रिका आणि हिंदू – पॅसिफिक महासागरातील देशांवर भारताचा आता अमिट प्रभाव निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन कमला हॅरिस यांनी केले.

    भारताचा जागतिक सहभाग केवळ भारतीयांसाठीच नाही, तर अमेरिका आणि जगभरातील लोकांसाठीही लाभदायक ठरला आहे. भारताला जागतिक महासत्ता म्हणून उदयास आणण्यात, “क्वाड”ला पुनरुज्जीवित करण्यात, हवामान वित्तावर लक्ष केंद्रित करून G20 चे नेतृत्व करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय संस्थांवर आणि जागतिक आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, अंतराळात अमेरिकेसोबत सहकार्य करण्यात मदत केल्याबद्दल कमला हॅरिस यांनी मोदींचे आभार मानले.

     मोदींच्या टेबलवर हेन्री किसिंजर

    या स्नेहभोजनात पंतप्रधान मोदींच्या टेबलवर हेन्री किसिंजर हे 100 वर्षीय अमेरिकन परराष्ट्र व्यवहार गुरू होते, ज्यांनी अलीकडच्या आठवड्यात भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या व्यवस्थापनाबद्दल प्रशंसा केली होती. त्यांच्या उजवीकडे मोदींच्या शेजारी बसलेले भारतीय- अमेरिकन उद्योजक, लोकशाही राजकारणातील समुदायाच्या सहभागाचे सक्रिय समर्थक दीपक राज होते. मोदींच्या डावीकडे कमला हॅरिस बसल्या होत्या आणि त्यांच्या डावीकडे पेप्सिकोच्या माजी प्रमुख इंदिरा नूयी होत्या. त्यांच्या समोर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि ब्लिंकन बसले होते.

    NSA अजित डोवाल परराष्ट्र विभागाचे उपसचिव रिचर्ड वर्मा, परराष्ट्र विभागातील सर्वोच्च रँकिंगचे भारतीय-अमेरिकन, अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू, भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांच्याशी बसून गप्पा मारताना दिसले, तर इंडो-पॅसिफिक समन्वयक कर्ट कॅम्पबेल – या सर्वांनी भेटीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एक टेबल सामायिक केले.

    माजी सभापती नॅन्सी पेलोसी आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या भारतीय-अमेरिकन सदस्यांसह काँग्रेसचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रख्यात उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानीही उपस्थित होते.

    Kamala and Modi bond: State Dept comes alive with the India-America connection

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार