विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अंतराळ यान बनवणाऱ्याच्या टीममध्ये कल्याणमधील तरुणीचा सहाभाग आहे.संजल गावंडे असे तिचे नाव आहे. अमेरिकेमधील ‘ब्ल्यू ओरिजिन’ या स्पेस कंपनीने अंतराळ सफरीची घोषणा केली आहे.Kalyan’s young woman in the US space tourism team
येत्या २० जुलैला या कंपनीतर्फे ‘न्यु शेफर्ड’ हे खासगी यान जगप्रसिद्ध ब्रँड अमेझॉनचे संस्थापक आणि ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांच्यासह काही निवडक पर्यटकांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे.
हे यान बनवणाऱ्या कंपनीच्या टिममध्ये कल्याणमधील संजल गावंडे या तरुणीचा सहाभाग आहे. इंजिनिअरीगचे शिक्षण पूर्ण करत विविध परीक्षा देत संजल हिनेही उंचीवर झेप घेतली आहे.तिच्या या यशामुळे तिच्या कुटूंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात संजल राहते. आई सुरेखा गावंडे या एमटीएनएलमधील तर वडील अशोक गावंडे हे केडीएमसीतील निवृत्त कर्मचारी आहेत.
काय आहे ‘न्यू शेफर्ड’…?
आतापर्यत अंतराळात केवळ उपग्रह किंवा त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठीच यान सोडले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत ‘स्पेस टुरिझम’ अर्थातच अंतराळ सफर नावाची नवीन संकल्पना अस्तित्वात आली आहे. त्यासाठी ‘ब्ल्यू ओरिजिन’ ही कंपनी काम करत असून अंतराळ पर्यटकांसाठी ‘न्यू शेफर्ड’ नावाचे यान 20 जुलैला अंतराळाच्या दिशेने झेपावणार आहे.