विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : आशियायी अमेरिकी नागरिकांवर हल्ले वाढत असताना अमेरिका गप्प बसणार नाही असा सज्जड इशारा अमेरेकिचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे.Jo Biden warn attackers
यावेळी त्यांनी न्याय विभागाला तत्काळ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. आशियायी वंशांच्या नागरिकांविरुद्ध हिंसाचार आणि परदेशातील नागरिकांना नाकारण्याचे धोरण चुकीचे आहे आणि हे थांबले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यादरम्यान त्यांनी न्यायविभागातंर्गत कोविड-१९ इक्विटी कृती दल समितीही नियुक्त केली. कोविड प्रतिबंधक लस आणि अन्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून देताना परदेशातील नागरिकांना भेदभावाची वागणूक दिली जाते का? यावर ही समिती लक्ष ठेवणार आहे.
उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी देखील वाढत्या हिंसेबद्धल चिंता व्यक्त केली आहे. कोणत्याही व्यक्तीला हानी पोचवणे हे स्वत:चेच नुकसान करून घेण्यासारखे आहे, असे त्या म्हणाल्या. याप्रकरणात मी आणि अध्यक्ष गप्प बसणार नाही. आशियायी नागरिकांवरील हल्ले थांबवण्यासाठी कडक पावले उचलले जातील.