• Download App
    जिनपिंग यांची तिबेट भेट : चिनी राष्ट्रपतींनी सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला, युद्धाच्या तयारीवर केले हे वक्तव्य Jinping's visit to Tibet: Chinese president reviews military readiness, says war readiness

    जिनपिंग यांची तिबेट भेट : चिनी राष्ट्रपतींनी सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला, युद्धाच्या तयारीवर केले हे वक्तव्य

    जिनपिंग यांनी तिबेट दौर्‍यादरम्यान पीएलएच्या तिबेट कमांडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.  सैनिकांचे प्रशिक्षण व युद्धाची तयारीचा त्यांनी पूर्ण आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे. Jinping’s visit to Tibet: Chinese president reviews military readiness, says war readiness


     विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारताला लागून असलेल्या तिबेटच्या सीमा भागात जाऊन भेट दिली आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.  येथे त्यांनी पीएलएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यात त्यांनी युद्धाच्या तयारीचा आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे.

    जिनपिंग यांनी अरुणाचल प्रदेश सीमेजवळील तिबेटमधील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या निंगची शहरालाही भेट दिली. यादरम्यान जिनपिंग यांनी तिबेटची राजधानी ल्हासामध्ये उच्च सैन्य अधिकार्‍यांशी बैठक घेतली. बैठकीत त्यांनी तिबेटची दीर्घकालीन स्थिरता आणि भरभराटीवर जोर दिला.

    चीनच्या राज्यस्तरीय ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार जिनपिंग यांनी तिबेट दौर्‍यादरम्यान पीएलएच्या तिबेट कमांडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.  सैनिकांचे प्रशिक्षण व युद्धाची तयारी पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.



    जिनपिंग 22 जुलै रोजी निंगची रेल्वे स्थानकात आले होते.  ते भारतीय सीमेजवळ आहे.  25 जूनपासून ल्हासा-निंगची रेल्वे मार्ग सुरू झाला. गेल्या काही वर्षांत चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी तिबेटच्या सीमेवरील शहराला भेट देण्याची ही पहिली वेळ होती. निंगचीनंतर जिनपिंग हाय-स्पीड ट्रेनने ल्हासा येथे पोहोचले. शुक्रवारी तिबेटमध्ये तैनात सैनिकांना भेटल्यानंतर ते बीजिंगला परतले.

    शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, जिनपिंग यांनी तिबेटच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त तिबेट स्वायत्त प्रदेशाचा प्रथमच दौरा केला. त्यांनी तिबेट जनतेचे अभिनंदन केले.  त्यांनी अनेक आदिवासींची भेट घेतली आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकाऱ्यांना त्यांची काळजी घेण्यास सांगितले.

    Jinping’s visit to Tibet: Chinese president reviews military readiness, says war readiness

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप

    Pakistan PM : ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पंतप्रधानांचा जळफळाट- आम्ही बदला घेऊ; संसदेत 5 भारतीय विमाने पाडल्याचा दावा

    Donald Trump : ट्रम्प यांनी UNची 19 हजार कोटींची मदत रोखली; 3000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना