विशेष प्रतिनिधी
केप कॅनव्हेराल – ॲमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बोझेस आणि त्यांचे बंधू मार्क हे २० जुलैला अल्पकाळासाठी अवकाशात फेरी मारणार आहेत. त्यांच्याबरोबर जाण्याची संधी एका व्यक्तीला दिली जाणार आहे.Jef Bozes will travel in universe
त्यासाठी ऑनलाइन लिलाव प्रक्रियेत भाग घेत एका व्यक्तीने २.८० कोटी डॉलरला ही संधी मिळविली आहे. या व्यक्तीचे नाव जाहीर करण्यात आले नसून प्रत्यक्ष उड्डाणाच्या काही दिवस आधी ते जाहीर केले जाईल. अमेरिकेचे अवकाशवीर नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते, त्या घटनेला २० जुलैला ५२ वर्षे पूर्ण होत आहेत.
त्यानिमित्त हे उड्डाण होणार आहे. या लिलावात १५९ देशांमधील ७५०० लोकांनी सहभाग घेतला होता. लिलावातून मिळालेली रक्कम युवकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी वापरली जाणार आहे.
Jef Bozes will travel in universe
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना संकटाच्या काळात चिनी अणुऊर्जा प्रकल्पात ‘गळती’च्या वृत्ताने अमेरिकेचा अलर्ट, फ्रेंच कंपनीकडून किरणोत्सर्गाचा इशारा
- महाराष्ट्रातून दिल्लीला जाणाऱ्या विमान प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बाळगण्याची गरज नाही
- अजित पवार नाना पटोलेंना म्हणाले, कोणी काही विधान करत असेल तर त्याला महत्व नाही
- रामद्रोहींकडून राजकीय फायद्यासाठी जमीन खरेदी व्यवहारात अनियमिततेचा आरोप, काडीचाही संशय नसल्याने चौकशी होणार नाही, विश्व हिंदू परिषदेने केले स्पष्ट
- रामभक्तांची दिशाभूल करण्यासाठी राजकीय षडयंत्र, जमीन बाजारभावानुसारच खरेदी, चंपत रॉय यांनी केले स्पष्ट