वृत्तसंस्था
दोहा : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने नव्या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. नीरज चोप्राने 5 मे (शुक्रवार) रोजी दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक केली. नीरजचा हा पहिला फेक स्पर्धेतील सर्वोत्तम ठरला. मात्र, पुन्हा एकदा नीरजला ९०० मीटरचा अडथळा पार करण्यात यश आले नाही.Javelin thrower Neeraj Chopra tops again, defeats world champion Anderson Peters to win Doha Diamond League
टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा चेक खेळाडू जेकोब वडलेच दुसऱ्या स्थानावर राहिला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने तिसरे स्थान पटकावले. गेल्या वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अँडरसन पीटर्सने नीरज चोप्राचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते. आता या विजयासह नीरज चोप्राने पीटर्सकडून मागील पराभवाचा बदला घेतला.
- Neeraj Chopra : नीरज चोप्राने लुसाने डायमंड लीग जिंकून रचला इतिहास, किताब जिंकणारा ठरला पहिला भारतीय
दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राची कामगिरी
पहिला प्रयत्न – 88.67 मी
दुसरा प्रयत्न – ८६.०४ मी
तिसरा प्रयत्न – ८५.४७ मी
चौथा प्रयत्न – फाऊल
पाचवा प्रयत्न – 84.37 मी
6 वा प्रयत्न – 86.52 मी
दोहा डायमंड लीगची अंतिम स्थिती
1. नीरज चोप्रा (भारत) – 88.67 मी
2. जाकुब वडलेच (चेक प्रजासत्ताक) – 88.63 मी
3. अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) – 85.88 मी
4. ज्युलियन वेबर (जर्मनी) – 82.62 मी
5. अँड्रियन मार्डेरे (मोल्दोव्हा) – 81.67 मी
6. केशॉर्न वॉलकॉट (त्रिनिदाद आणि टोबॅगो) – 81.27 मी.
7. रॉडरिक जी. डीन (जपान) – 79.44 मी
8. कर्टिस थॉम्पसन (यूएसए) – 74.13 मी
डायमंड लीगची अंतिम फेरी यूजीनमध्ये होणार
दोहा येथे होणारा हा कार्यक्रम डायमंड लीग मालिकेचा पहिला टप्पा आहे. 16 आणि 17 सप्टेंबर रोजी यूजीनमध्ये डायमंड लीग फायनलसह समारोप होणार आहे. डायमंड लीगच्या एका लेगमध्ये प्रत्येक खेळाडूला प्रथम क्रमांकासाठी 8, द्वितीय क्रमांकासाठी 7, तृतीय क्रमांकासाठी 6 आणि चौथ्या क्रमांकासाठी 5 गुण दिले जातात.
Javelin thrower Neeraj Chopra tops again, defeats world champion Anderson Peters to win Doha Diamond League
महत्वाच्या बातम्या
- धर्मवीर’ चित्रपटानंतर अभिनेता प्रसाद ओक आता दिसणार वेगळ्या भूमिकेत..
- थांबलेली भाकरी पुढच्या भाकऱ्या फिरवणार; राष्ट्रवादीच्या पवारकृत सर्जरीत अजितदादा समर्थक धोक्यात!!
- अजितदादांना निवृत्तीची कल्पना दिली होती; सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष पद अमान्य!!; पत्रकार परिषदेत पवारांची महत्त्वाची माहिती
- अजितदादांच्या बंडाला “खरा” ब्रेक; जिल्हा ते राज्य पातळीपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांना शरद पवारांचे बढतीच्या मधाचे बोट!!