वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : सुदूर ब्रह्मांडाचा सर्वांगानी वेध घेण्यासाठी नासाने तयार केलेल्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचे आज यशस्वीरीत्या अवकाशात उड्डाण करण्यात आले. युरोपियन स्पेस एजन्सीने देखील यासाठी मदत केली आहे. आजपर्यंतच्या जगातल्या अनेक शक्तिशाली टेलिस्कोप मधली ही सर्वाधिक शक्तिशाली टेलीस्कोप मानली जात आहे.James Webb Space Telescope, the largest & most powerful space telescope ever constructed successfully lifts-off
अवकाशामध्ये सुमारे 15 लाख किलोमीटर दूरवर येत्या 40 दिवसांमध्ये प्रवास करून जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप विशिष्ट ठिकाणी स्थापित करण्यात येईल. या स्पेस टेलीस्कोप मध्ये 18 षटकोनांनी जोडलेली पोर्टल असून त्याद्वारे ब्रह्मांडातील ग्रह-ताऱ्यांचे एकावेळी अनेक फोटो ही टेलिस्कोप घेऊ शकेल. 18 षटकोनांची पोर्टल्स नासाने तयार केली असून या प्रत्येक पोर्टलवर सुमारे 48 ग्रॅम सोने चढविण्यात आले आहे. ही पोर्टल्स रिफ्लेक्टरच्या रूपात काम करून ब्रह्मांडातील विविध गोष्टींचे आणि ग्रह-ताऱ्यांचे फोटो घेण्यात मदत करतील. एकाच वेळी विविध कोनांमधून या ग्रह-ताऱ्यांचे फोटो पृथ्वीपर्यंत पोचविण्यात येतील.
तब्बल 1500000 किलोमीटरचा हा प्रवास येत्या 40 दिवसांमध्ये पूर्ण करून ब्रह्मांडात विशिष्ट ठिकाणी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप स्थापित करणे हे नासाच्या शास्त्रज्ञांसाठी आव्हान आहे. गेली 4 वर्षे सुमारे 10000 शास्त्रज्ञ या स्पेस टेलिस्कोप तयार करण्यासाठी काम करत होते. आज केनेङी स्पेस स्टेशनवरून यशस्वी उड्डाण करण्यात आलेल्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या प्रवासात कोणताही अडथळा आला नाही आणि ती विशिष्ट ठिकाणी स्थापन करण्यात नासाला यश आले तर पुढची 5 ते 10 वर्षे ही टेलिस्कोप कार्यरत राहून अवकाशातील ग्रह तार्यांचे आणि अन्य वस्तूंचे असंख्य फोटो पृथ्वीवासीयांना ती पाठवू शकेल. त्यातून ब्रह्मांडातील अनेक रहस्य उलगडण्याची अपेक्षा आहे.
James Webb Space Telescope, the largest & most powerful space telescope ever constructed successfully lifts-off
महत्त्वाच्या बातम्या
- लष्कराचे मिग-21 विमान कोसळले, पायलटचा मृत्यू
- महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध, रात्री नऊ ते सकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश
- हद्दीत घुसणाऱ्यांनाच नाही सीमेपलीकडील दहशतवाद्यांनाचाही खात्मा करू शकतो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
- बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या ब्राम्हणांना शिव्या