वृत्तसंस्था
जकार्ता : Jakarta Fire इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे मंगळवारी एका 7 मजली इमारतीला भीषण आग लागली. स्थानिक चॅनल कोम्पास टीव्हीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 20 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. यात 5 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश आहे. यापैकी काहींचा मृत्यू गुदमरल्याने झाला.Jakarta Fire
मीडिया रिपोर्टनुसार, काही लोक अजूनही इमारतीत अडकले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचे काम अजूनही सुरू आहे.Jakarta Fire
ज्या इमारतीला आग लागली, ते टेरा ड्रोन इंडोनेशियाचे कार्यालय आहे. ही कंपनी खाणकाम (मायनिंग) आणि शेती (ॲग्रीकल्चर) संबंधित कामांसाठी ड्रोन सर्वेक्षण सेवा पुरवते.Jakarta Fire
अग्निशमन दलाचे पथक तपास करत आहे
आगीची सुरुवात इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून झाली. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांना ती आटोक्यात आणता आली नाही.
पोलिसांनी सांगितले की, पहिल्या मजल्यावर ठेवलेल्या बॅटऱ्यांमध्ये आग लागली होती. यामुळे आग पसरत गेली आणि लवकरच सातव्या मजल्यापर्यंत पोहोचली.
सध्या संपूर्ण इमारतीची तपासणी सुरू आहे. अग्निशमन दलाचे पथक मजल्या-मजल्याने तपास करत आहे.
Jakarta Fire Kills 20 in 7-Storey Building Terra Drone Indonesia Photos Videos Report
महत्वाच्या बातम्या
- गुजरातेत 6 वर्षांच्या चिमुरडीवर निर्भयासारखे क्रौर्य; बलात्कारात अपयशी ठरल्याने गुप्तांगात रॉड घातला, आरोपीला अटक
- पार्थ पवारांचा जमीन घोटाळा; शीतल तेजवानीने लपवून ठेवलेले दस्त अखेर जप्त, मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरण
- India Russia : भारतीय वस्तू 40 ऐवजी 24 दिवसांत रशियात पोहोचतील; मोदी-पुतिन यांच्या करारामुळे 6000 किमीची बचत
- SIR Process : SIR प्रक्रिया-तामिळनाडूत 84 लाख मतदारांचे अर्ज जमा नाहीत; नाव वगळले जाऊ शकते, 11 डिसेंबर अंतिम तारीख