वृत्तसंस्था
मिलान : इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांचा “घटस्फोट” झाला आहे. 10 वर्षांच्या संसारानंतर मेलोनी यांनी आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.Italy PM Giorgia Meloni announces separation from partner after 10 years
माझे पती आंद्रे गिआनबर्नो यांच्याबरोबरचे माझे सहजीवन आता संपुष्टात येत आहे. 10 वर्षे आम्ही एकत्र राहिलो. एक उत्तम सहजीवन अनुभवले. आंद्रे यांनी मला माझ्या मुलीच्या रूपाने एक सुंदर उपहार दिला. पण आता इथून पुढे आमचे मार्ग वेगळे होत आहेत, अशा आशयाचे ट्विट जॉर्जिया मेलोनी यांनी केले आहे.
एका रिपोर्टनुसार 46 जॉर्जिया मेलोनी आणि आंद्रे गिआनबर्नो यांचा विवाह झालेला नाही, पण ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहत होते त्यांना 7 वर्षांची मुलगी आहे. आंद्रे याच्याच बरोबरची मैत्री कायम राहील. मी त्याचे रक्षण करेन. माझ्या मुलीची ही जपणूक करेन. कारण आम्ही गेली 10 वर्षे खूप आनंदात होतो. आमचे मार्ग वेगळे झाले तरी हा आनंद इथून पुढे कायम राहावा अशी माझी इच्छा आहे, अशी पोस्ट मेलोनी यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे.
Italy PM Giorgia Meloni announces separation from partner after 10 years
महत्वाच्या बातम्या
- EDला कलम 50 अंतर्गत अटकेचा अधिकार नाही; हायकोर्टाने म्हटले- एजन्सीला समन्स बजावण्याचा आणि कागदपत्रे पाहण्याचा अधिकार
- सपा आमदार अबू आझमींच्या निकटवर्तीय विनायक ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट कागदपत्रे, 200 कोटींची बेनामी मालमत्ता
- अटारी बॉर्डरवर देशाचा सर्वात उंच राष्ट्रध्वज; केंद्रीय मंत्री गडकरींनी फडकावला तिरंगा, म्हणाले- हा तिरंगा टेहळणी तंत्रज्ञानाने सुसज्ज
- न्यूजक्लिक फॉरेन फंडिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस, पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला