• Download App
    जपानी राजकुमारीचे प्रेमासाठी वाट्टेल ते! सामान्याशी विवाहाच्या हट्टापायी १३. ५ लाख डॉलर्सही नाकारले|It will be for the love of a Japanese princess! The hassle of marrying a commoner 13. Also denied 5 million

    जपानी राजकुमारीचे प्रेमासाठी वाट्टेल ते! सामान्याशी विवाहाच्या हट्टापायी १३. ५ लाख डॉलर्सही नाकारले

    विशेष प्रतिनिधी

    टोकियो : प्रेमासाठी लोक राजपाटही नाकारतात याचे उदाहरण जपानची राजकुमारी माको हिने घालून दिले आहे. एका सर्वसामान्य घरातील तरुणाशी विवाह करण्यासाठी राजकुमारीने राजघराण्याकडून मिळणारे १३.५ लाख डॉलर्स नाकारले आहेत. तिच्या नियोजित पतीच्या आईचा एक आर्थिक वाद असल्याने जपानच्या राजघराण्याने या विवाहाचा समारंभ करायचा असा निर्णयही घेतला आहे.It will be for the love of a Japanese princess! The hassle of marrying a commoner 13. Also denied 5 million

    राजघराण्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजकुमारी माको हिच्या होणाºया सासूशी संबंधित एका वित्तीय वादामुळे राजकुमारीच्या विवाहाला जनतेचा पूर्णपणे पाठिंबा नाही. त्यामुळे मोठा विवाहसमारंभ होणार नाही. माको हिचा नियोजित वर केइ कुमोरो याच्या आईशी संबंधित वाद राजघराण्याला पसंत नाही.



    जनतेकडूनही यावरून राजकुमारीला टीका सहन करावी लागत आहे. याच कारणासाठी विवाहाला तीन वर्षे उशीर लागला आहे. मात्र, आता राजकुमारी माको आणि तिचा मित्र कुमोरे यांनी विवाह करायचा निर्णय घेतला आहे.

    राजघराण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजघराणे सोडल्याबद्दल दिले जाणारे १३.५ लाख डॉलर्स घेण्यासही माकोने नकार दिला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर राजकुमारी माको ही राजघराण्यातील पहिली महिला आहे, जिला सर्वसामान्य व्यक्तीशी विवाह केल्याबद्दल ही रक्कम मिळणार नाही. तिला एक मानसिक आजार असल्याचे नुकतेच निदान झाले आहे. विवाहाच्या तीन दिवस आधी ३०वा वाढदिवस साजरी करणारी माको ही राजा नारूहितो यांची पुतणी आहे.

    माको व कुमोरो हे टोकियोच्या इंटरनॅशनल ख्रिश्चियन विद्यापीठात एकाच वर्गात शिकत होते. तेथेच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. त्यांनी सप्टेंबर २०१७मध्येच विवाह करण्याची घोषणा केली होती; परंतु वित्तीय वाद समोर आल्यानंतर विवाहाला उशीर झाला. २९ वर्षीय कुमोरो मागील आठवड्यात न्यूयॉर्कहून जपानमध्ये परतले. ते तेथे कायद्याचा अभ्यास करीत होते.

    २६ ऑक्टोबर रोजी दोघेही विवाहाची नोंदणी करण्यासाठी जातील व तेथेच संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करतील. यावर्षी ते न्यूयॉर्कमध्ये नव्या आयुष्याला सुरुवात करतील. त्यांच्या विवाहाला लोकांचा पूर्ण पाठिंबा नसल्यामुळे ते मेजवानी किंवा अन्य रीतीरिवाजांचे आयोजन करणार नाहीत.

    It will be for the love of a Japanese princess! The hassle of marrying a commoner 13. Also denied 5 million

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या