• Download App
    इस्रायली शहरांवर रॉकेटचा वर्षाव सुरुच; हल्ल्यात ६० हून अधिक लढाऊ विमानांचा सहभाग |Istrayal attacks on Palestine continues

    इस्रायली शहरांवर रॉकेटचा वर्षाव सुरुच; हल्ल्यात ६० हून अधिक लढाऊ विमानांचा सहभाग

    विशेष प्रतिनिधी

    जेरुसलेम : इस्राईलच्या हल्ल्यात आज गाझा शहरातल्या इस्लामिक विद्यापीठामधील अनेक इमारती कोसळल्या. इस्राईलच्या सैन्याने आज शेकडो बाँबचा मारा केला.Istrayal attacks on Palestine continues

    या हल्ल्यात ६० हून अधिक लढाऊ विमानांनी सहभाग घेतला होता. हमासने सोडलेले ड्रोन विमानही पाडण्यात आले. हमासकडून डागल्या गेलेल्या ९० टक्के रॉकेटचा हवेतच नाश केला जात असल्याचा दावा इस्राईलने केला आहे.



    हमासच्या म्होरक्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्राईलकडून सुरु असलेले हवाई हल्ले आणि इस्राईलच्या शहरांवर होणारा रॉकेटचा वर्षाव यामुळे दोन्ही बाजूंकडील नागरिकांमध्ये भयाचे वातावरण आहे.

    शांतता प्रस्थापित होण्याची कोणतीही शक्यता दिसत नसून आजही दोन्ही बाजूंकडून अविरत मारा सुरु होता.इस्राईलच्या हल्ल्यांविरोधात आज इस्राईलमध्येच राहत असलेल्या

    अरब समुदायाकडून बंद पुकारण्यात आला होता. तरीही कारवाई सुरुच ठेवणार असल्याचे इस्राईलने स्पष्ट केले आहे. हमासच्या हल्ल्यांमध्येही इस्राईलमध्ये मोठे नुकसान झाले आहे.

    Istrayal attacks on Palestine continues

    Related posts

    Saudi Arabia : सौदी अरेबियातील रस्ते अपघातात 45 भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस आणि डिझेल टँकरची धडक

    Sheikh Hasina, : शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; बांगलादेश कोर्टाने विद्यार्थ्यांच्या हत्येचे दोषी मानले; युनूस म्हणाले- भारताने शेख हसीना यांना सोपवावे

    Tariff India : अमेरिकेत महागाई वाढताच ट्रम्प यांना उपरती, भारतातील चहा-कॉफी आणि मसाल्यांवरील 50% टॅरिफ हटवला