• Download App
    Israeli हमासने युद्धबंदीच्या अटी मान्य न केल्याने, इस्रायली सैन्याने केला गाझावर मोठा हल्ला

    हमासने युद्धबंदीच्या अटी मान्य न केल्याने, इस्रायली सैन्याने केला गाझावर मोठा हल्ला

    युद्धबंदीचा पहिला टप्पा आज (रविवार) सकाळी स्थानिक वेळेनुसार ८.३० वाजता सुरू होणार होता.

    विशेष प्रतिनिधी

    गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी करार झाल्यानंतरही युद्धबंदीला विलंब होत आहे. कारण हमासने अद्याप इस्रायलच्या अटी पूर्ण केलेल्या नाहीत. इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. युद्धबंदीच्या अटींनुसार, हमासला इस्रायलला ओलिसांची यादी द्यावी लागली होती परंतु हमासने अद्याप इस्रायलला ओलिसांची यादी दिलेली नाही. ज्यामुळे युद्धबंदीवर संकटाचे ढग दाटू लागले आहेत. युद्धबंदीचा पहिला टप्पा आज (रविवार) सकाळी स्थानिक वेळेनुसार ८.३० वाजता सुरू होणार होता.

    युद्धबंदीबाबत, इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हागर यांनी रविवारी सांगितले की, इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदीची अंमलबजावणी करण्यास विलंब झाला कारण हमासने पहिल्या दिवशी सोडण्यात येणाऱ्या ओलिसांची यादी इस्रायलला पाठवण्याची आपली जबाबदारी पूर्ण केली नाही. युद्धबंदी सुरू होण्याची सकाळी ८.३० ची अंतिम मुदत संपत असताना, इस्रायली टँकनी पुन्हा एकदा गाझावर गोळीबार सुरू केला.

    स्थानिक टेलिव्हिजनवर प्रसारित केलेल्या एका संक्षिप्त भाषणात, हागर म्हणाले की राजकीय क्षेत्राने लष्कराला अंमलबजावणी पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत आणि युद्धबंदी लागू होईपर्यंत गाझा पट्टीत हल्ले सुरू ठेवण्याचे स्वातंत्र्य राखले आहे. हागार म्हणाले की, १५ महिन्यांच्या युद्धाच्या संभाव्य समाप्तीचा मार्ग मोकळा करणाऱ्या युद्धबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी सैन्य पूर्णपणे तयार आहे, परंतु जर हमासने कराराच्या अटींचे उल्लंघन केले तर कारवाई करण्यासही ते तयार आहेत.

    Israeli forces launch major attack on Gaza after Hamas refuses to accept ceasefire terms

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Los Angeles : लॉस एंजेलिसमध्ये ड्रायव्हरने गर्दीत कार घुसवली; 20 जखमी, 10 गंभीर; अपघाताचे कारण अस्पष्ट

    Thailand : थायलंडमध्ये बौद्ध भिक्षूंचे सेक्स स्कँडल उघडकीस; महिलेने 100 कोटी उकळले, 80 हजार अश्लील फोटो व व्हिडिओ

    Pakistan : 9 दहशतवादी अड्ड्यांवर दुरुस्तीचे काम; ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त ‘अतिरेकी कारखाने’ पुन्हा सुरू