• Download App
    Israeli attack थेट प्रक्षेपणादरम्यान इस्त्रायली हल्ला; आयआरआयबी कार्यालयावरील बॉम्बहल्ल्याचे थरारक दृश्य व्हायरल

    Israeli attack : थेट प्रक्षेपणादरम्यान इस्त्रायली हल्ला; आयआरआयबी कार्यालयावरील बॉम्बहल्ल्याचे थरारक दृश्य व्हायरल

    विशेष प्रतिनिधी

    तेहरान : इराण आणि इस्त्रायलमधील संघर्षाने गंभीर वळण घेतले असून, सोमवारी इस्त्रायली हवाई दलाने थेट तेहरानमधील इराणच्या सरकारी प्रसारमाध्यम आयआरआयबी (IRIB) च्या मुख्यालयावर बॉम्बहल्ला केला. विशेष म्हणजे, हल्ल्याच्या वेळी चॅनेलवर थेट कार्यक्रम सुरू होता, आणि त्या क्षणीचा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. सदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. Israeli attack

    या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, कार्यक्रम चालू असतानाच अचानक जोरदार स्फोटाचा आवाज होतो, स्टुडिओ धुळीच्या लोटांनी भरून जातो आणि घाबरलेला निवेदक तातडीने बाहेर पळतो. काही क्षणांतच थेट प्रक्षेपण बंद पडते आणि त्याऐवजी प्री-रेकॉर्डेड कार्यक्रम दाखवण्यात येतो. हल्ल्यामुळे प्रक्षेपण तातडीने थांबवावे लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून, कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. Israeli attack



    हल्ल्यानंतर इस्त्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी ठाम शब्दांत प्रतिक्रिया देताना म्हटलं, “इराणी प्रचार आणि चिथावणीचा मुख्य स्त्रोत लवकरच नाहीसा होईल.” यापूर्वीच इस्त्रायली लष्कराने तेहरानमधील नागरिकांना संभाव्य हल्ल्याबाबत इशारा दिला होता आणि परिसर रिकामा करण्याचे आवाहन केले होते. मात्र, हा इशारा वेळेवर सर्वांना मिळाला नाही, असा आरोप काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी केला आहे.

    या घटनेनंतर इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग ठरवत त्याचा बदला घेतला जाईल, असे जाहीर केले. इस्त्रायलने मात्र हल्ल्याचे समर्थन करत म्हटले की, “स्वसंरक्षण आणि इराणकडून चालणाऱ्या दुष्प्रचाराला रोखण्यासाठी हे आवश्यक होते.”

    दरम्यान, या घडामोडींमुळे पश्चिम आशियात तणाव अधिक तीव्र झाला आहे. पाकिस्तानने देखील खबरदारीचा उपाय म्हणून इराणसोबतची बलुचिस्तान सीमेवरील वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. अमेरिका, रशिया आणि चीनसह अनेक जागतिक शक्तींनी चिंता व्यक्त करत दोन्ही देशांनी संयम ठेवावा, असे आवाहन केले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर इशारा दिला की, “जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.”

    सध्या दोन्ही देशांमध्ये क्षेपणास्त्र, ड्रोन आणि सायबर हल्ल्यांची मालिका सुरू असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तेहरानसह अनेक भागांमध्ये आपत्कालीन परिस्थिती लागू करण्यात आली आहे.

    Israeli attack during live broadcast; Thrilling footage of bomb attack on IRIB office goes viral

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    इराण – इजरायल संघर्षाचे कारण सांगून ट्रम्प G7 बैठक अर्ध्यावर सोडून कॅनडातून अमेरिकेत, पण मोदींची भेटही टाळली!!

    Iran Live News : इराणमध्ये लाइव्ह न्यूज देताना अँकरच्या मागे स्फोट, इस्रायलच्या हल्ल्याचा व्हिडिओ

    Iran President:’ट्रम्प यांना अणु करार हवा असेल तर आधी इस्रायलला रोखा…’, इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे अमेरिकेला युद्धबंदीचे आवाहन