विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इराणचा सर्वोच्च धार्मिक नेता आय्यतुल्लाह अली खामेनी याचा “सद्दाम हुसेन” करूनच थांबू अशी धमकी इजराइलने तेहरानवर तुफान बॉम्बफेक करतानाच दिली. Ayatollah Ali Khamenei
काही वेळापूर्वीच इजराइलच्या विमानांनी तेहरानमधील इराणच्या गुप्त लष्करी कमांड वर बॉम्ब फेक केली. या बॉम्ब फेकीत इजरायलने नवा लष्कर प्रमुख मारला. इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांची फळी नेस्तनाबूत केली. इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेन याला अमेरिकेने जसे मारले, तसेच इराणचा सर्वोच्च धार्मिक नेता आय्यतुल्लाह अली खामेनीला मारून युद्ध थांबवू, अशी धमकी इजरायलचे संरक्षण मंत्री इजराइल काट्स यांनी दिली.
इराण मधले लष्करी अधिकारी घाबरले असून ते आपापल्या कमांडच्या जागांवरून पळ काढत असल्याचा दावा इजरायली सैन्य दलाने केला. त्याचवेळी युद्ध थांबवण्यासाठी रशियाने इजराइल आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली पण इराणने रशियाला प्रतिसाद दिला नाही. Ayatollah Ali Khamenei
इराणमध्ये जमिनीखालच्या फॉरदो अण्वस्त्र केंद्रासह 10 अण्वस्त्र केंद्रे इजरायली सैन्याच्या टार्गेटवर आहेत. इजराइली हवाई दलाची विमाने लवकरच या 10 केंद्रांवर अचूक हल्ले करून ती नष्ट करतील. या 10 अण्वस्त्र केंद्रांच्या आसपास राहात असलेल्या इराणी नागरिकांनी तिथून सुरक्षित स्थळी जावे यासाठी त्यांना इशारा दिल्याचे असे इजराइल काट्स यांनी स्पष्ट केले.
Israel warns Iran’s Ayatollah Ali Khamenei could meet fate similar to Saddam Hussein
महत्वाच्या बातम्या
- NIA raids राजस्थान, मध्य प्रदेशातील दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर एनआयएने छापेमारी
- Chirag Paswan : चिराग पासवान बिहार विधासभा निवडणूक स्वबळावर निवडणूक लढवणार?
- Vijay Rupani : विजय रुपानींचा DNA जुळला; जाणून घ्या, अंतिम संस्कार कधी अन् कुठे होणार?
- वयाच्या मुद्द्यावर अजितदादांची चंद्रराव तावरेंवर टीका; पण आधी त्यांनीच काढल्या होत्या चंद्ररावांच्या नाकदुऱ्या!!