Israel Vs Palestine : इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान सुरू झालेला वाद आता युद्धामध्ये रूपांतरित झाला आहे. बुधवारपर्यंत हमासने (इस्त्रायलच्या मते अतिरेकी संघटना) इस्रायलवर सुमारे 3000 रॉकेट डागले आहेत. प्रत्युत्तराच्या कारवाईत इस्रायलने आपले सैन्य वापरले नाही, परंतु अत्यंत सामर्थ्यशाली हवाई दलाच्या माध्यमातून पॅलेस्टाईनमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवला आहे. या युद्धात आतापर्यंत 6 इस्रायली (एक भारतीय महिला) आणि 53 पॅलेस्टिनी नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. Israel Vs Palestine Update 59 Killed So Far in Bombing From Both Side
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान सुरू झालेला वाद आता युद्धामध्ये रूपांतरित झाला आहे. बुधवारपर्यंत हमासने (इस्त्रायलच्या मते अतिरेकी संघटना) इस्रायलवर सुमारे 3000 रॉकेट डागले आहेत. प्रत्युत्तराच्या कारवाईत इस्रायलने आपले सैन्य वापरले नाही, परंतु अत्यंत सामर्थ्यशाली हवाई दलाच्या माध्यमातून पॅलेस्टाईनमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवला आहे. या युद्धात आतापर्यंत 6 इस्रायली (एक भारतीय महिला) आणि 53 पॅलेस्टिनी नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
ही परिस्थिती आता आणखी चिघळत जाणार आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गॅंट्स यांनी बुधवारी संध्याकाळी म्हटले की, गाझा पट्टी आणि पॅलेस्टाइन येथे आमच्या लष्कराचे हल्ले थांबणार नाहीत. जोपर्यंत शत्रू पूर्णपणे शांत होत नाही तोपर्यंत आम्ही थांबण्यास तयार नाही. त्यानंतरच शांतता पूर्वस्थितीवर आणण्याबाबत चर्चा होऊ शकते. इस्रायल आता दीर्घकाळ शांतता राखण्यासाठी उपाययोजना करेल. आम्ही 6 हमास कमांडर ठार केले आहेत. तेथील सर्व प्रमुख इमारती, कारखाने आणि सुरुंग उडवण्यात आले आहेत.
इस्त्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले, “आमचे सैन्य अधिकारी आणि जवान आता कोणत्याही सीझफायरच्या बाजूने नाहीत. आता तोडगा काढायचाच असेल तर तो दीर्घकाळासाठी काढावा लागेल. दुसरीकडे हमास नेते हनिया म्हणाले, जर इस्रायलला युद्ध वाढवायचे असेल तर आम्हीही थांबायला तयार नाहीत.
रॉकेट हल्ले सुरूच
हमासने तेल अवीव, एश्केलॉन आणि होलोन शहरावर सोमवार ते बुधवारपर्यंत सातत्याने रॉकेट डागले. या रॉकेटचा बहुतांश भाग इस्रायलची क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा आयर्न डोमने रोखला, परंतु अनेक रॉकेट लोकवस्तीच्या भागात पडून त्यांचा स्फोट झाला. हमासतर्फे इस्रायलवर हजारांहून अधिक रॉकेट डागण्यात आले. इस्रायलवर एवढा मोठा हल्ला 7 वर्षांनंतर झाला आहे.
Israel Vs Palestine Update 59 Killed So Far in Bombing From Both Side
महत्त्वाच्या बातम्या
- दीदीगिरी : राज्यपालांनी हिंसापीडितांशी भेटण्यावर ममता बॅनर्जींचा आक्षेप, म्हणाल्या- राज्य सरकारच्या आदेशानंतर करू शकता जिल्हा दौरे
- विरोधकांचा पत्रप्रपंच : पीएम मोदींना १२ नेत्यांचे पत्र; मोफत लसीकरण, मोफत अन्नधान्याची मागणी
- चीनमधून लिहिला गेला लॅन्सेटमध्ये मोदींविरोधात लेख, बिजींगमधील महिला संपादकाने घेतली सुपारी!
- आमदार बनसोडेंवर गोळीबार झालाच नाही, उलट त्यांच्या कार्यकर्त्यांनीच तानाजी पवारला केली बेदम मारहाण
- कोरोनाविरोधी लढ्यात नौदलाचे ऑपरेशन समुद्रसेतू