• Download App
    Israel इराण आंतरखंडीय क्षेपणास्त्रावर अण्वस्त्रे चढविण्याच्या बेतात असतानाच इस्राईलचे इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर अचूक हवाई हल्ले!!

    Israel vs Iran : इराण आंतरखंडीय क्षेपणास्त्रावर अण्वस्त्रे चढविण्याच्या बेतात असतानाच इस्राईलचे इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर अचूक हवाई हल्ले!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : इराण आपली काही अण्वस्त्रे आंतरखंडीय क्षेपणास्त्रावर (ballistic missile) चढविण्याच्या बेतात असतानाच इसराइलने इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर अचूक हवाई हल्ला केला. इसराइलचे भारतातले राजदूत रूवेन अझर यांनी ही माहिती दिली.

    इराणने आपली काही ड्रोन्स इजरायलच्या दिशेने सोडली होती. ती प्रत्यक्ष इस्रायल मध्ये पोहोचण्यास 7 तास लागणार होते. परंतु याच दरम्यान आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी इजराइल वर हल्ला करण्याचा इराणचा कावा होता. या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांवर काही अण्वस्त्रे लादण्यासाठी इराण मधले काही तज्ञ प्रत्यक्षात काम करत होते. हजारो मैलांची भूमी नष्ट करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रांमध्ये होती. इजरायल ते परवडले नसते. कारण इजराइलचा आकार भारतातल्या हरियाणा किंवा मिझोराम या दोन राज्यांसारखाच छोटा आहे. त्यामुळे इजरायलने इराणी अण्वस्त्र केंद्रांवर अचूक हल्ले केले.

    या संदर्भातली अचूक गुप्त माहिती इजरायली गुप्तहेर संघटना मोसादने मिळवली. त्यामुळे इजरायली हवाई दलाने इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर अचूक हल्ला केले, असे रूवेन अझर म्हणाले.

    9 अणुबॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक असलेले युरेनियम इराणने गोळा केले असून त्यातून अणुबॉम्बची निर्मिती करायची प्रक्रिया सुरू केली आहे. सगळ्यात जगासाठी हे धोकादायक आहे हे लक्षात घेऊनच इजरायलने इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर अचूक हल्ले केले, असे रूवेन अझर यांनी स्पष्ट केले ‌

    Israel precision airstrikes on Iran’s nuclear sites

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Russia : रशियाचा युक्रेनवर 500 क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला; 23 जखमी; झेलेन्स्कींचा दावा- 270 क्षेपणास्त्रे पाडली

    British Chancellor Rachel Reeves : अर्थमंत्री रीव्हज ब्रिटिश संसदेत रडतांना दिसल्या; पौंड 1% घसरला, विरोधक म्हणाले- त्यांची खुर्ची धोक्यात

    Israel : इस्रायलने गाझामध्ये युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारला; हमासच्या उत्तराची प्रतीक्षा