• Download App
    Israel Hamas War : बंधक बनवलेल्या दोन अमेरिकन महिलांना हमासने १४ दिवसांनंतर केले मुक्त; जो बायडेन म्हणाले... Israel Hamas War  Two American women held hostage by Hamas freed after 14 day Joe Biden said

    Israel Hamas War : बंधक बनवलेल्या दोन अमेरिकन महिलांना हमासने १४ दिवसांनंतर केले मुक्त; जो बायडेन म्हणाले…

    महिलांच्या सुटकेनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी कतारचे आभार मानले.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :   इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आज (शनिवार) 14 वा दिवस आहे. दरम्यान, हमासने दोन आठवड्यांपूर्वी ओलीस ठेवलेल्या दोन अमेरिकन महिलांची सुटका केली आहे. या दोघींमध्ये आई आणि मुलीचे नाते आहे. त्यांच्या सुटकेनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी कतारचे आभार मानले. यासोबतच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या महिलांशी बोलून त्यांची विचारपूसही केली. Israel Hamas War  Two American women held hostage by Hamas freed after 14 day Joe Biden said

    अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सुटका झालेल्या दोन महिलांशी फोनवर संवाद साधला. ते म्हणाले, नुकत्याच सुटका झालेल्या आमच्या दोन महिला नागरिकांशी मी बोललो. मी त्यांना विचारले की तुम्ही ठीक आहात का?, अमेरिकन सरकार त्यांच्यासोबत आहे. याचबरोबर  ते म्हणाले, जिल आणि मी लाखो अमेरिकन लोकांसोबत कायम उभे आहोत.

    अन्य एका  ट्वीटमध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले की, मी इस्रायलच्या पंतप्रधानांशी बोललो आणि पुन्हा त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय, मी त्यांच्याशी गाझाला मानवतावादी मदत देण्याबाबत बोललो आणि युद्ध त्याच्या मर्यादेत लढण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला. याचबरोबर हमासने ओलीस ठेवलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबद्दलही बोललो.

    Israel Hamas War  Two American women held hostage by Hamas freed after 14 day Joe Biden said

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Jammu and Kashmir : जम्मू – काश्मिरातील सरकारी शाळांना वाटलेल्या पुस्तकावरून वाद; हाफिज सईदला महान म्हटले; भाजप म्हणाली- हा शैक्षणिक जिहाद; UAPA अंतर्गत FIR

    Trump : ट्रम्प म्हणाले – एका हल्ल्यात इराणी नेतृत्व संपले असते; इराण – तुमच्याकडे ना सभ्यता ना सन्मान; खामेनींच्या अंत्यसंस्काराला जनसागर

    PoK Protests : PoK मध्ये पाकिस्तानी सैन्याने लोकांवर गोळीबार केला; पाकिस्तान सरकारविरोधात 40 हजार आंदोलक जमले होते; अनेक लोक जखमी