इस्त्रायली सैन्य ग्राउंड ऑपरेशन आणखी तीव्र करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सतत वाढत आहे. गेल्या 21 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने बदला म्हणून गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराने गाझामध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ले तीव्र केल्याचे वृत्त आहे.आता इस्रायली लष्कराने 100 लढाऊ विमानांनी गाझावर बॉम्बहल्ला केला आहे. Heavy bombing of Gaza by 100 warplanes destroys Hamas base Internet and power outages
गाझामधील बहुतांश भागात इंटरनेट विस्कळीत झाले आहे. गाझामध्ये आज भयानक संकटाची रात्र असल्याचे सांगितले जात आहे. इस्रायली सैन्य गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांवर बॉम्बफेक करत आहेत. आयडीएफचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितले की, इस्रायली सैन्याने गाझा पट्टीमध्ये गेल्या काही तासांत हवाई हल्ले केले आहेत.
इस्त्रायली सैन्य आज रात्री ग्राउंड ऑपरेशन आणखी तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हागारी म्हणाले की IDF उत्तर गाझा आणि त्याच्या आसपासच्या भागात हल्ले सुरू ठेवेल. पॅलेस्टिनींनी गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील भागात स्थलांतर करावे. आयडीएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, लष्कर हमासच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले करत आहे.
Israel bombards Gaza with 100 fighter jets destroys Hamas base Internet and power outages
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीत नागरी संरक्षण स्वयंसेवकांना काढून टाकण्याचा प्रस्ताव मंजूर; सरकारने स्वतः एलजीकडे पाठवली होती फाइल, आता केजरीवाल सुप्रीम कोर्टात
- संयुक्त राष्ट्रात इस्रायल-हमास युद्ध थांबवण्याचा ठराव मंजूर; बाजूने 120 मते, 14 विरोधात; भारतासह 45 देशांचे मतदान नाही
- 10 वर्षांची शिक्षा ऐकताच माफिया डॉन मुख्तार अन्सारी भर कोर्टात रडत पडला आडवा!!
- दिवसभराची तोंडी वक्तव्ये आणि त्याचा प्रत्यक्ष कृतीत परिणाम!!; वाचा नेमका काय??